राजमुंद्री हे आंध्र प्रदेशातल्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातील एक मोठे शहर आहे. आद्य तेलगू कवी नन्नय्या यांचे हे जन्मठिकाण असून, आंध्र प्रदेशची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. देशातील सर्वाधिक जुन्या शहरांपैकी एक असलेले हे शहर वैदीक संस्कृतीचे माहेरघर म्हणूनही ओळखले जाते. पूर्व गोदावरी जिल्ह्याचे मुख्यालय या शहरात असून, गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर ते वसलेले आहे.
प्रेक्षणीय शहर
राजमुंद्री येथे अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. या शहरातील गोदावरी नदीवर असणारे तीन पूल हे दक्षिण भारतातील सर्वाधिक लांब आहेत. येथील इस्कॉन मंदिर, अय्यप्पा मंदिर, पुष्कर घाट, मार्कंडेय स्वामी मंदिर प्रसिद्ध आहे.
Leave a Reply