आधुनिक डोंबिवली

डिसेंबर १९२१ मध्ये डोंबिवली येथे ग्रामपंचायत अस्तित्वात आली. कै मणीलाल ठाकूर हे या ग्रामपंचायतीचे पहीले अध्यक्ष तर कै बहिराव अभ्यंकर हे पहीले सरचिटणीस होते.
ग्रामपंचायतीच्या स्थापनेनंतर १९३१ साली वीजपुरवठा सुरु झाला. १९३६ साली पंचायत विहीर बांधण्यात आली. वीज व पाणी आल्यामुळे या शहराची वस्ती वाढू लागली.
१९५८ साली सप्टेंबर महिन्यात नगरपालिका अस्तित्वात आली. या नगरपालिकेचे उद्घाटन आमदार कृष्णराव धुळप यांच्या हस्ते झाले आणि कै वि पो तथा बापूसाहेब पेंडसे यांनी पहिल्या अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळला.
१९८३ साली कल्याण डोंबिवली महानगर पालिका स्थापन झाली व सौ आरती मोकल या पहिल्या महापौर झाल्या. या शहराने आजतागायत सांस्कृतिक नगर अशी आपली वेगळी ओळख जपली आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*