भारतीय अभियांत्रिकीचा आविष्कार – कोकण रेल्वे

Konkan Railway - A Technological Marvel by Indian Engineers

एकेकाळी अत्यंत कठीण आणि अशक्य वाटत असलेले कोकणवासियांचे एक स्वप्न प्रत्यक्षात आले ते कोकण रेल्वेच्या उभारणी नंतर.

भारतीय अभियांत्रिकीचा एक उत्कृष्ट आविष्कार म्हणजे कोकण रेल्वे.

अत्यंत कठीण आणि खडतर भागातून या रेल्वेमार्गाची ऊभारणी करण्यात आली. यासाठी प्रथमच कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना करण्यात आली. या महामंडळाच्या प्रमुकपदी ई. श्रीधरन नावाचे अत्यंत कायर्क्षम अधिकारी नेमण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय अभियंत्यांनी हे शिवधनुष्य अत्यंत लिलया पेलले आणि  मुंबईपासून थेट दक्षिण भारतात जाण्यासाठी हा मार्ग सुरु झाला.

मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग या पाचही जिल्हातून जाणार्‍या कोकण रेल्वेचे रत्नागिरी आणि कारवार हे दोन विभाग आहेत. मुंबईहून कोकण रेल्वेचा प्रवास खर्‍या अर्थाने अनुभवायचा असेल तर दिवसाच्या प्रवासाला पर्याय नाही.

कोकणातील प्रमुख पीक भात असून मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. कोकणचा आंबा प्रसिध्द असून हा भाग पर्यटकाचे कायम आकर्षण ठरलेला आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*