थंड हवेचे ठिकाण माथेरान

मुंबईपासून सर्वात जवळ असलेले आणि सहजपणे जाता येणारे थंड हवेचे ठिकाण म्हणजे माथेरान.  सह्याद्रीच्या डोंगररांगात असलेले हे छोटेखानी गाव इंग्रजांच्या काळातील बंगल्यांनी नटलेले आहे. मुंबई-पुणे लोहमार्गावर कर्जतच्या अलिकडे असलेल्या नेरळ या स्थानकावरुन माथेरानला जाण्यासाठी मिनी ट्रेनची व्यवस्था आहे.  माथेरानमध्ये इंधनावर चालणार्‍या गाड्यांना पूर्णपणे मज्जाव आहे. त्यामुळे संपूर्ण गावात फक्त पायवाट किंवा घोड्यावर बसून जावे लागते. १८५४ मध्ये सर मॅलेटने माथेरान या थंड हवेच्या ठिकाणाचा शोध लावला. गर्द हिरवीगार वनराई आणि मोठा तलाव तसेच व्हा पॉंईटस, कॅथड्रेल पार्क, ऑलिम्पिया रेसकोर्स, राबाग खेडे […]

कोयना अभयारण्य

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात कोयना अभयारण्य आहे. कोयना जलाशयाच्या कडेकडेने कोयना अभयारण्य पसरले आहे. ४२६ किलोमीटर एकूण क्षेत्रफळ असलेल्या या अभयारण्याला सन १९८५ मध्ये अभयारण्याचा दर्जा प्राप्त झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक घनदाट जंगलात कोयना […]

ऐतिहासिक शहर अलिबाग

अलिबाग हे कोकणच्या किनारपट्टीवरील मुंबईपासून अतिशय जवळ असलेले ऐतिहासिक शहर आहे. मुंबईपासून जवळच असल्यामुळे येथे पर्यटकांची सतत रिघ लागलेली असते. सेकंड होम साठी अनेकजण आता अलिबागला पसंती देऊ लागले आहेत. […]

इगतपुरी – एक नयनरम्य हिल स्टेशन

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी हे शहर महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखले जाते. येथे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो.  अनेक छोटे-मोठे धबधबे या ठिकाणी पहायला मिळतात. इगतपुरी शहर मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावर मुंबईपासून सुमारे १३० किमी वर आहे. समुद्र सपाटीपासून या शहराची उंची सुमारे १९०० फूट आहे. ज्याप्रमाणे खंडाळा घाट ओलांडल्यावर खंडाळा लागते त्याचप्रमाणे  कसारा घाट ओलांडल्यावर इगतपुरी शहर लागते.  इगतपुरी आणि खंडाळा साधारणपणे एकाच उंचीवर आहेत. इगतपुरी गावाबाहेर डोंगराच्या पायथ्याशी असलेले विपश्यना केंद्र शहराचे खास आकर्षण आहे. येथे  देशातील निरनिराळ्या भागातून, तसेच परदेशांतूनही अनेक लोक विपश्यनेसाठी येतात. […]

ऑरेज सिटी – नागपूर

नागपूर हे शहर ऑरेंज सिटी म्हणून प्रसिद्ध आहे. नागपूरची संत्री केवळ विदर्भ, राज्य, देशातच नव्हे तर जगात प्रसिध्द आहेत. येथील संत्र्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली मागणी आहे. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे. दरवर्षी येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होते.

देशातील पहिली सैनिकी शाळा सातारा शहरात

महाराष्ट्रातील सातारा शहरात २३ जून १९६१ रोजी देशातील पहिल्या सैनिकी शाळेची स्थापना करण्यात आली. पहिल्या सैनिकी शाळेमुळे सातारा शहराची देशाच्या कानाकोपर्‍यात ओळख निर्माण झाली. राष्ट्रप्रेम निर्माणासाठी या शाळेचे महत्त्व अबाधित आहे. या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी […]

ठाणे जिल्ह्याचे महाबळेश्वर – जव्हार

जव्हार हे छोटेखानी शहर सह्याद्रीच्या पर्वतरांगेत डहाणू- नाशिक मार्गावर वसले आहे. ठाणे जिल्ह्याचे महाबळेश्वर म्हणून हे शहर प्रसिध्द आहे. आता नवीन निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्यामध्ये जव्हारचा समावेश झाला आहे. १४ व्या शतकापासून जव्हार राजगादीचे स्थान […]

देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक – माहूर गड

महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील माहूर अथवा माहूरगड हे एक प्रसिध्द धार्मिक स्थळ आहे.  पैनगंगा नदीच्या काठावर सातपुडा पर्वतरांगाच्या कुशीत असलेले माहूर हे समुद्रसपाटीपासून २६०० फूट उंचीवर असून त्याला घनदाट जंगलाचा वेढा आहे. देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक पूर्ण पीठ […]

भारतीय अभियांत्रिकीचा आविष्कार – कोकण रेल्वे

एकेकाळी अत्यंत कठीण आणि अशक्य वाटत असलेले कोकणवासियांचे एक स्वप्न प्रत्यक्षात आले ते कोकण रेल्वेच्या उभारणी नंतर. भारतीय अभियांत्रिकीचा एक उत्कृष्ट आविष्कार म्हणजे कोकण रेल्वे. अत्यंत कठीण आणि खडतर भागातून या रेल्वेमार्गाची ऊभारणी करण्यात आली. यासाठी प्रथमच कोकण रेल्वे महामंडळाची स्थापना करण्यात आली. या महामंडळाच्या प्रमुकपदी ई. श्रीधरन नावाचे अत्यंत कायर्क्षम अधिकारी नेमण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय अभियंत्यांनी हे शिवधनुष्य अत्यंत लिलया पेलले आणि  मुंबईपासून थेट दक्षिण भारतात जाण्यासाठी हा मार्ग सुरु झाला. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग या पाचही जिल्हातून जाणार्‍या कोकण रेल्वेचे […]

एलिफंटा केव्हज

मुंबईच्या समुद्र किनार्‍यापासून अरबी समुद्रामध्ये लेण्या आहेत. या लेण्याना एलिफंटा केव्हज् असे म्हणतात. गेट वे ऑफ इंडियापासून या लेण्यासाठी मोटारबोटीसोबतच लेण्या पाहण्याचा आनंद मिळतो. युनेस्कोने या लेण्यांना जागतिक वारसा घोषित केले आहे.::

1 2