कोकणचा मेवा – टिकाऊ पदार्थ

ताज्या कोकणी मेव्याची चव अनुभवणे ही पर्वणीच असते. मात्र वर्षभर ही चव सोबत ठेवण्यासाठी किंवा आवडत्या पाहुण्यांचा पाहुणचार करतांना या मेव्यापासून बनविलेले पदार्थ उपयोगात आणले जातात. रत्नागिरीच्या गावागावातून असे पदार्थ तयार स्वरुपात मिळतात.

फणसपेाळी, आंबापोळी, आंबावडी, विविध प्रकारची सरबते, कैरीचे पन्हे, चॉकलेट्स, टीन किंवा बाटलीबंद आंब्याचा रस, चिक्की आदी विविध पदार्थ पर्यटक आवडीने खरेदी करतात. या प्रक्रीया उद्योगावर अनेकांचे रोजगारही अवलंबून आहेत. या पदार्थंाच्या माध्यमातून कोकणची ओळख देशाच्या विविध भागात जाते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*