Web
Analytics
कझाकस्तान – शहरे आणि गावे

कझाकस्तान

कझाकस्तान (कझाक: Қазақстан ; रशियन: Казахстан ;), अधिकृत नाव कझाकस्तानाचे प्रजासत्ताक (कझाक: Қазақстан Республикасы, कझाकस्तान रेस्पुब्लिकासी; रशियन: Республика Казахстан, रेस्पुब्लिका कझाकस्तान 😉 हा मध्य आशिया व पूर्व युरोपातील संधिप्रदेशावर वसलेला एक देश आहे. क्षेत्रफळानुसार नवव्या क्रमांकाचा हा देश जगातील सर्वांत मोठा भूवेष्टित देश आहे. याचे २७,२७,३०० वर्ग कि.मी. विस्तारलेले क्षेत्रफळ पश्चिम युरोपाहून मोठे आहे. जगभरातील ६ सार्वभौम तुर्की देशांपैकी तो एक आहे. रशिया, किर्गिझस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, चीन या देशांना व कास्पियन समुद्राला लागून याच्या सीमा आहेत. मंगोलियाशी याच्या सीमा थेट भिडल्या नसल्या, तरीही मंगोलियाच्या सर्वांत पश्चिमेकडील टोकापासून याची पूर्व टोकाकडील सीमा केवळ ३८ कि.मी. अंतरावर आहे. इ.स. १९९७ साली कझाकस्तानातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर असलेल्या अल्माटीपासून देशाची राजधानी हलवून अस्ताना येथे नेण्यात आली.

मध्य आशियात वसलेला कझाकस्तान ४०° उ. ते ५६° उ. अक्षांशांदरम्यान आणि ४६° पू. ते ८८° पू. रेखांशांदरम्यान पसरला आहे. २७,२७,३०० वर्ग कि.मी. क्षेत्रफळ असलेला ह देश जगातील नवव्या क्रमांकाचा मोठा देश असून सर्वांत मोठा भूवेष्टित देश आहे. पश्चिम युरोपाएवढे याचे आकारमान आहे. याचा बहुतांश भूभाग आशियात मोडत असला, तरीही उरल पर्वतरांगांच्या पश्चिमेकडील याचा अल्पसा भूप्रदेश पूर्व युरोपात मोडतो[१]. कझाकस्तानाचा पूर्वपश्चिम विस्तार पश्चिमेस कास्पियन समुद्रापासून पूर्वेस आल्ताय पर्वतरांगांपर्यंत पसरला असून दक्षिणेकडील मध्य आशियाई वाळवंटी प्रदेशापासून उत्तरेकडील पश्चिम सैबेरिया प्रदेशापर्यंतचा दक्षिणोत्तर भूभाग याने व्यापला आहे. याच्या रशियासोबत ६,८४६ किलोमीटर, उझबेकिस्तानासोबत २,२०३ किलोमीटर, चिनी जनता-प्रजासत्ताकासोबत १,५३३किलोमीटर, किर्गिझस्तानासोबत १,०५१ किलोमीटर, तर तुर्कमेनिस्तानासोबत ३७९ किलोमीटर लांबीच्या सीमा भिडल्या आहेत. सोव्हियेत संघाच्या काळात याचा काही भूभाग याच्यापासून तोडला गेला व तोडलेला भूभाग शेजारील चिनी जनता-प्रजासत्ताकाच्या शिंच्यांग प्रांतास व उझबेकिस्तानाच्या काराकालपाकस्तान प्रदेशास देण्यात आला.

कझाकस्तानाची अर्थव्यवस्था मध्य आशियाई अर्थव्यवस्थांपैकी सर्वांत मोठी आहे. कझाकस्तानाला नैसर्गिक इंधनसाठ्यांचे वरदान लाभले असल्यामुळे कच्च्या खनिज तेलाचे उत्पादन कझाक अर्थव्यवस्थेचा लक्षणीय हिस्सा आहे. याखेरीज गहू, कापड व प्राणिज उत्पादने या वस्तूंची कझाकस्तान निर्यात करतो. युरेनियम-उत्पादनाच्या इ.स. २०१० सालातील सांख्यिकीनुसार जगभरातील ३३% उत्पादन कझाकस्तानात झाले असून कझाकस्तान जगात अव्वल क्रमांकाचा युरेनियम-उत्पादक देश आहे.

राजधानी : अस्ताना
सर्वात मोठे शहर : अल्माटी
अधिकृत भाषा : कझाक
स्वातंत्र्य दिवस :(सोवियेत संघ पासून)
१६ डिसेंबर, इ.स. १९९१
राष्ट्रीय चलन : टेंगे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


Whatsapp वर संपर्क साधा..