इच्छापुरम हे आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यातील तालुका मुख्यालय असलेले एक महत्त्वाचे शहर आहे. आंध्र प्रदेश आणि ओरिसा राज्यांच्या सीमेवर हे शहर वसले असून, या शहराच्या पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. हे शहर जरी आंध्र प्रदेशात असले, तरी ओरिसा राज्याच्या औद्योगिक राजधानीचे शहर असलेले बेरहमपूर हे इच्छापुरमला सर्वाधिक जवळ आहे.
प्रसिद्ध जगन्नाथ मंदिर
इच्छापुरम हा आंध्र प्रदेशातील विधानसभेचा एक मतदारसंघ आहे. येथील जगन्नाथ मंदिर प्रसिद्ध आहे. रेल्वेने हे शहर देशाशी जोडलेले असून भुवनेश्वर, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, मुंबई येथून इच्छापुरम येथे जाण्यासाठी गाड्या उपलब्ध असतात.
Leave a Reply