हैती हा देश कॅरिबियन समुद्रातील हिस्पॅनियोला बेटाच्या पश्चिम भागात आहे. हैतीच्या पूर्वेला डॉमिनिकन प्रजासत्ताक हा देश आहे. हैती ग्रेटर अँटिल्सचा भाग आहे. पोर्ट औ प्रिन्स ही हैतीची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
हैती या देशाचे क्षेत्रफळ २७,७५० वर्ग किलोमीटर इतके असून लोकसंख्या ९.८ दशलक्ष आहे. या देशात गूर्ड हे चलन प्रचलित आहे. हैतीतील फक्त ४५ टक्के नागरिक साक्षर असून या देशाची शासकीय भाषा फ्रेंच आहे.
हैती हा स्वातंत्र्य मिळालेला लॅटिन अमेरिकेतील सर्वात पहिला देश होता. या देशाला इ.स. १८०४ मध्ये फ्रेंचांच्या वसाहतींकडून स्वातंत्र्य मिळाले. येथील लोकसंख्येपैकी बहुतांश लोक निग्रो आहेत. उर्वरित नागरिक म्हणजे येथे स्थायिक झालेल्या फ्रेंचाच्या आणि गुलामंच्या वर्णसंकरातून जन्मलेली प्रजा आहे.
हैतीचे मुख्य उत्पादन कॅाफी हे आहे. तसेच कापूस, कोको आणि तंबाखूचे उत्पादनही येथे मोठ्या प्रमाणात होते. या देशात बॅाक्साईट हे खनिज मोठ्या प्रमाणात सापडते. तसेच येथे पर्यटनाद्वारे मोठ्या प्रमाणात परकीय चलन प्राप्त केले जाते.
राजधानी व सर्वात मोठे शहर :पोर्ट ओ प्रिन्स
अधिकृत भाषा :हैतियन क्रिओल, फ्रेंच
स्वातंत्र्य दिवस :(फ्रान्सपासून) जानेवारी १, १८०४
राष्ट्रीय चलन :हैती गॉर्दे (HTG)
( Source : Wikipedia )
Leave a Reply