गोंदिया जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

नागझिरा अभयारण्य – हे या जिल्ह्यातील अभयारण्य पर्यटकांमध्ये प्रसिध्द आहे. दिनांक ७ जून, १९७० रोजी अभयारण्याचा दर्जा मिळालेले, सुमारे १५० चौ. कि.मी परिसरात पसरलेले नागझिरा अभयारण्य हे व्याघ्र दर्शनासाठी, वर्षभरात सरासरी ३०,००० पर्यटकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरते. येथे सस्तन प्राण्यांच्या विविध प्रजाती, पक्ष्यांच्या अनेक प्रजाती तर सरपटणार्‍या प्राण्यांच्या बर्‍याच प्रजाती पाहावयास मिळतात. येथील जंगलांत प्रामुख्याने चितळ, सांबर, वाघ, अस्वल, गवा इत्यादी प्राणी व तितर, मोर आदी इत्यादी पक्षी आढळतात. शोभेची झाडे, सुवासिक व औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे असे सुमारे २०० प्रकारचे वृक्ष या अभयारण्यात आढळतात. प्राणी व वृक्षसंपदेनी नटलेले हे अभयारण्य आहे.
नवेगाव राष्ट्रीय उद्यान – येथील पक्षी अभयारण्याचे डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य असे नामकरण झाले असून, महाराष्ट्रातील ६०% पक्ष्यांच्या प्रजाती आपल्याला येथे पाहायला मिळतात. येथे असलेला जंगलाचा भाग हा नागझिरा अभयारण्यापासून सुरू होऊन  गडचिरोली जिल्ह्यातून थेट छत्तीसगढपर्यंत जातो. असे म्हटले जाते की, हा जंगलप्रदेश हत्तींचा येण्या-जाण्याचा मार्ग होता व म्हणूनच नागझिरा अभारण्यातील हत्तीखोदरा व नवेगाव अभयारण्यीतल हत्तीपंगडी या ठिकाणांना तशा प्रकारची नावे मिळाली.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील प्राचीन शिवमंदिर, सालेकसा येथील गढमातेचे मंदिर, कामथा येथील शिवमंदिर, व तिरोरा तालुक्यातील दक्राम सुकडी येथील श्री चक्रधर स्वामींचे मंदिर ही धार्मिक स्थळेही पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*