महाराष्ट्रातील सर्वांत उत्तरेकडील जिल्हा असे नंदुरबार जिल्ह्याचे वर्णन केले जाते. जिल्ह्याचे क्षेत्रफळ ५०३५ कि.मी.² इतके आहे. २०११ च्या गणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १३,०९,१३५ इतकी आहे. नंदुरबार जिल्ह्याला दोन राज्याच्या सीमा लाभल्या आहेत. गुजराथ राज्य पश्चिमोत्तर सीमेवर, तर मध्य प्रदेश राज्य जिल्ह्याच्या पूर्वोत्तर सीमेवर आहे. राज्याच्या वायव्य सीमेवर असलेल्या या जिल्ह्याच्या उत्तरेस गुजरात व मध्य प्रदेश या राज्यांचा भाग आहे.
जिल्ह्याच्या पूर्वेला मध्य प्रदेश व धुळे जिल्हा, दक्षिणेला धुळे जिल्हा; आणि पश्र्चिमेला गुजरात राज्य आहे. जिल्ह्याच्या उत्तर भागात सातपुड्याची पर्वतरांग असून या पर्वतरांगांमुळे नंदुरबार, मध्यप्रदेश व गुजरात राज्यांपासून वेगळा झाला आहे. जिल्ह्याचे हवामान प्रामुख्याने उष्ण व कोरडे आहे. जिल्ह्याच्या पश्र्चिम व उत्तर भागात पावसाचे प्रमाण जास्त असून, पूर्व ते दक्षिण भागात हेच प्रमाण कमी आहे. पावसाळ्यात जिल्ह्यातील तापमान अधिक दमट असते.
Leave a Reply