आर्मेनिया

आर्मेनिया हा काळा समुद्र व कॅस्पियन समुद्र यांमधील युरेशियाच्या दक्षिण कॉकेशस भागातील एक डोंगराळ वभूपरिवेष्टित देश आहे. या देशाच्या पश्चिमेस तुर्कस्तान, उत्तरेस जॉर्जिया, पूर्वेस अझरबैजान, तर दक्षिणेस इराण व अझरबैजानाचा नाख्चिवान प्रांत आहेत. पूर्व युरोप व पश्चिम आशिया यांच्या उबरठ्यावरील या देशाचे ऐतिहासिक काळापासून युरोपाशी राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक लागेबांधे आहेत.
२९,८०० चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या या देशाची लोकसंख्या ३० लाख आहे. ख्रिश्चन हा येथील प्रमुख धर्म असून येथील साक्षरता ९९ टक्के आहे. येरेवान ही या देशाची राजधानी आहे.

भूतपूर्व सोव्हिएत संघापैकी एक घटक प्रजासत्ताक असलेला आर्मेनिया आता बहुपक्षीय लोकशाहीवादी प्रजासत्ताक आहे. आर्मेनियाला प्राचीन सांस्कृतिक व राजकीय वारसादेखील लाभला आहे. इसवी सनाच्या चौथ्या शतकाच्या सुरुवातीला (सर्वसाधारण मान्यतेनुसार इ.स. ३०१) आर्मेनियाचे राज्य हे या ख्रिश्चन धर्म स्वीकारणारे या परिसरातील पहिले राज्य होते. आजही आर्मेनियातील बहुसंख्य जनता ख्रिश्चन धर्मीय असली तरीही आर्मेनियाचे प्रजासत्ताक घटनात्मकदृष्ट्या धर्मनिरपेक्ष राज्य आहे. या देशाला १९९१ साली रशिया कडून स्वातंत्र्य मिळाले. हे एक डोंगराळ राष्ट्र असून येथील जमीन अतिशय सुपीक आहे. बटाटे, अाॅलिव्ह, द्राक्ष, कापूस ही येथील प्रमुख पिके आहेत.

आर्मेनियाचे स्थानिक भाषेतील नाव हय्क आहे. मध्ययुगात याला हयस्तान असे नाव होते. हय्क हा आर्मेनियन लोकांचा मूळ पुरुष मानला जातो. त्याच्या नावावरून त्या देशाला हयस्तान हे नाव मिळाले. कोरेनच्या मोझेसनुसार हय्कने बाबिलोनियाचा राजा बेल ह्याला ख्रिस्तपूर्व २४९२ मध्ये युद्धात हरवले व अरारात ह्या भूभागावर आपले राज्य स्थापन केले.

प्राचीन फारसी कोरीव लेखात (इ.स.पू. ५१५) आर्मेनियाचा उल्लेख आर्मिना असा आढळतो. झेनोफोन या ग्रीकांच्या सेनापतीने आर्मेनियन लोकजीवन व आदरातिथ्याबद्दल लिहून ठेवले आहे. त्याच्या नोंदीनुसार आर्मेनियन लोक फारसीसदृश्य भाषा बोलतात.

आर्मेनिया दहा प्रांताMत (आर्मेनियन भाषेत “मार्झर”एकवचन “मार्झ”) विभागला गेला असून येरेवान ह्या शहराला (आर्मेनियन कघाक)राजधानी म्हणून विशेष प्रशासकीय दर्जा देण्यात आला आहे. रत्येक प्रांताचा मुख्य कार्यकारी अधिकारी (मार्झपत) हा आर्मेनिया सरकारकडून नियुक्त केला जातो. येरेवानचा मुख्य कार्यकारी अधिकारी महापौर असून त्याची नेमणूक राष्ट्राध्यक्षांकडून केली जाते.

प्रत्येक प्रांतात स्वयंशासित असे विभाग (आर्मेनियन हमान्क्नेर/एकवचन हमान्क) येतात.प्रत्येक विभागात नागरी किंवा ग्रामीण वस्त्या असतात.२००७ मधील नोंदींनुसार आर्मेनियात ४९ नागरी भाग असून ८६६ ग्रामीण भाग आहेत. येरेवान या राजधानीच्या शहराचे १२ स्वायत्त विभाग आहेत.

राजधानी व सर्वात मोठे शहर : येरेव्हान
अधिकृत भाषा : आर्मेनियन
स्वातंत्र्य दिवस : घोषणा:२३ ऑगस्ट १९९० ; मान्यता:२१ सप्टेंबर १९९१ ; पूर्णत्व:२१ डिसेंबर १९९१
राष्ट्रीय चलन : आर्मेनियन द्राम


Armenia is a nation, and former Soviet republic, in the mountainous Caucasus region between Asia and Europe. Among the earliest Christian civilizations, it’s defined by religious sites including the Greco-Roman Temple of Garni and 4th-century Etchmiadzin Cathedral, headquarters of the Armenian Church. Khor Virap Monastery is a pilgrimage site near Mount Ararat, a dormant volcano just across the border in Turkey.

( Source : Wikipedia )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*