अमरावती जिल्हा

Amaravati District

विदर्भातील अमरावती विभागाचे प्रमुख ठिकाण असलेला अमरावती हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा जिल्हा आहे. (आंध्र प्रदेशातही अमरावती नावाचा एक जिल्हा आहे)
चिखलदरा हे विदर्भातील एकमेव गिरिस्थान आणि राज्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण याच जिल्ह्यात आहे.  संपूर्ण महाराष्ट्रात केवळ याच ठिकाणी कॉफीचे मळे आहेत.  चिखलदरा विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखले जाते.
मेळघाटातील व्याघ्र प्रकल्पासाठी प्रसिद्ध असणारा, तसेच वर्‍हाडी बोलीचे वैशिष्ट्य आवर्जून जपणारा अशीही अमरावतीची प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील. अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वत हा मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राचा सीमावर्ती प्रदेश आहे.
या जिल्ह्यातील वरूड आणि मोर्शी हे तालुके संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहेत. अमरावती जिल्ह्यातील शेंदूरजना बाजार हे गाव गुरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे.

So here’s a pro-tip start hanging writing book titles in essays around the stem buildings on your campus