स्पेन

स्पेन, अधिकृत नाव स्पेनचे राजतंत्र हा दक्षिण युरोपामध्ये वसलेला एक देश आहे. स्पेनच्या अखत्यारित भूमध्य समुद्रातील बालेआरिक व कॅनेरी बेटे आणि अटलांटिक समुद्रातील काही बेटे तसेच उत्तर आफ्रिकेतील काही भूभाग आहे. स्पेनच्या उत्तरेस बिस्के, दक्षिणेस व पूर्वेस भूमध्य समुद्र आणि पश्चिमेस अटलांटिक महासागर असून ह्या देशाच्या सीमा पश्चिमेस पोर्तुगाल, पूर्वेस फ्रान्स व आंदोरा आणि दक्षिणेस मोरोक्को व जिब्राल्टर यांना लागून आहेत. फ्रान्सनंतर स्पेन हा पश्चिम युरोपमधला दुसरा मोठा व इबेरियन द्वीपकल्पातील तीन देशांपैकी सर्वात मोठा देश आहे. माद्रिद ही स्पेनची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

स्पेनमध्ये अध्यक्षीय लोकशाही असून हा देश युरोपीय महासंघाचा १९८६ पासुन सभासद आहे. हा देश आर्थिकदृष्ट्या विकसित असून स्पॅनिश अर्थव्यवस्था जगात आठव्या आणि युरोपीय महासंघात पाचव्या क्रमांकावर आहे.

राजधानी व सर्वात मोठे शहर :माद्रिद
अधिकृत भाषा :स्पॅनिश (कास्तेयानो), गॅलिशियन, बास्क, कातालान
राष्ट्रीय चलन :युरो (१९९९ पासून), स्पॅनिश पेसेटा (१९९९ पर्यंत)

सौजन्य : विकिपीडिया

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*