इचन काला

उझबेगिस्तान व इराण दरम्यानच्या वाळवंटात इचन काला हे प्राचीन सहर आहे. या शहरात मध्य आशियन शैलीत बांधण्यात आलेल्या इमारती आणि मशिदींचे अवशेष पहायला मिळतात.

व्हिकेंझा

इटलीतील व्हिकेंझा हे शहर दुसर्‍या सतकात वसविण्यात आले आहे. आंड्रिया पॅलाडियो या प्रसिध्द वास्तुरचनाकाराने १५ व्या शतकात या शहराची रोमन शैलीत पुर्नउभारणी केली.

तक्षशिला ज्ञानपीठ

तक्षशिला हे पाकिस्तानातील रावळपिंडीपासून ३५ किमी. अंतरावर आहे. कैकयीपुत्र भरत याने ही नगरी वसवली व तिला आपला मुलगा तक्ष याचे नाव दिले असे मानले जाते. इ.स.पूर्व आठव्या शतकापासून इ.स.चौथ्या शतकापर्यंत येथे तक्षशिला विद्यापीठ होते. या […]

हवाई बेट

हवाई बेट हा ज्वालामुखीनिर्मित बेटांचा समूह आहे. […]

ड्युब्रॉनिक

अॅडियाट्रिकचा मोती समजले जाणारे ड्युब्रॉनिक हे शहर क्रोएशियात आहे. या शहराचा शोध सातव्या शतकात लागला रिनायझन्स काळातील सुंदर चर्च. इमारती येथे पहायला मिळतात.

टनेल ऑफ लव्ह

टनेल ऑफ लव्ह हा युक्रेनमधील दोन रेल्वे स्टेशनला जोडणारा रस्ता आहे. मात्र, या मार्गावरील झाडांच्या रचनेमुळे तो जगप्रसिध्द झाला आहे. जगभरातील प्रेमीयुगुलांसाठी हा रस्ता महत्वाचे ठिकाण बनले आहे.

चीनमधील माऊंट हुआंगशांग

चीनच्या सांस्कृतिक इतिहासात हुआंगशांग पर्वताला महत्त्वाचे स्थान आहे. चित्रकार, लेखक, कवी यांच्यासाठी हा पर्वत प्रेरणादायी असल्याचे चीनमधील नागरिकांचे मत आहे.      

ऐतिहासिक ब्रिजटाऊन

बार्बाडोस मधील ब्रिजटाउन शहराची ओळख प्राचीन बंदर अशीही आहे. बार्बाडोसची राजधानी असलेल्या या शहराचे प्रशासन पार्लमेंटव्दारा चालविले जाते. या शहराची नोंद युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत आहे.

1 2