श्री बल्लाळेश्वर. पाली जि. रायगड
रायगड जिल्हयातील सुधागड तालुक्यात पाली येथे “श्री बल्लाळेश्वर ” हे स्थान अत्यंत प्रसिध्द व जागृत स्थान आहे. अष्टविनायकातील हे एक महत्त्वाचे मंदीर. श्री बल्लाळेश्वर हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती त्याच्या बल्लाळ या भक्ताच्या नावाने प्रसिद्ध आहे. मुंबईहून पनवेल-खोपोली मार्गे पाली १२४ किमी. असून पनवेल-पेण-वडखळ-नागोठणे-वाकण मार्गे पाली १०८ किमी . […]