श्रीधर गजानन माडगूळकर

घराण्याचा वारसा :
थोर स्वातंत्र्यसैनिक व आधुनिक वाल्मिकी ग.दि.माडगूळकर यांचे सुपुत्र.

साहित्यिक क्षेत्र :
१९७० साली “जिप्सी” या खास तरुणांसाठी असलेल्या मासिकाचे संपादन करुन अनेक नवीन लेखकांना पुढे येण्यास संधी दिली.त्याच प्रमाणे “धरती” व साप्ताहिक “मायभूमी” या नियतकालिकांचा उपसंपादक म्हणून काम केले आहे.त्यांच्या अनेक कथा महाराष्ट्रातील प्रतिष्ठित नियतकालिकांमधुन प्रसिध्द झाल्या आहेत. “आठी आठी चौसष्ट” ही कादंबरी राजकीय कादंबरीत मैलाचा दगड समजली जाते. गदिमांच्या आठवणींवरील “मंतरलेल्या आठवणी” हे पुस्तक प्रसिद्ध, दै.लोकमत, दै.तरुण भारत या सारख्या अनेक वृत्तपत्रांमधून लेखन.५ व ६ जानेवारी २०१३ रोजी गोवा इथे भरलेल्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या आठव्या शेकोटी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष,’अजून गदिमा’ हे पुस्तक कॉन्टिनेन्टल प्रकाशनातर्फे लवकरच प्रसिद्ध होत आहे.

सांस्कृतिक क्षेत्र:
गदिमांची गाणी व आठवणी,थोरली पाती-धाकटी पाती या सारख्या साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन. ई.टिव्ही मराठी,झी मराठी, पुणे आकाशवाणी वरील अनेक कायर्क्रमात सहभाग.

संगणक व इंटरनेट :
१९९७ साली इंटरनेटवर मराठी भाषेतील “जाळं” या पहिल्या साप्ताहिकाची सुरवात करुन याचे यशस्वी संपादन केले.गदिमा.कॉम या मराठीतील सर्वात मोठया साहित्यिक वेबसाईटच्या रचनेत सल्लागार म्हणून मोलाची कामगिरी बजावित आहेत. मराठीसृष्टी.कॉम या साहित्यिक वेबसाईटच्या सल्लागार मंडळाचे सदस्य.

शिक्षणक्षेत्र :
सांगली जिल्हातील माडगूळे या खेडयात गजानन विकास प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना करुन कै.ग.दि.माडगूळकर हायस्कूल चालू केले,सुमारे ८ एकर जागेवर या शाळेच्या इमारतीचे बांधकाम असुन या शाळेत सुमारे ५०० विद्यार्थी शिकत आहेत.

विश्वस्त :
गदिमा प्रतिष्ठान,पुणे
गजानन विकास प्रतिष्ठान,माडगूळे

तसेच खालील सरकारी संस्थांवर सहभाग :
१) संजय गांधी निराधार योजना (अध्यक्ष,शिवाजीनगर मतदार संघ) (५ वर्ष)
२) सेंसॉर मंडळ,मुंबई
३)आय.टी.आय निवड समिती. (दोन वेळा)
४) महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ. (दोन वेळा)
५) फिल्म अॅडव्हायझरी कमिटी.
६)ऑल इंडिया रेडिओ,पुणे,सल्लागार समिती.
७)पुणे दुग्धविकास प्रकल्प सल्लागार समिती.
८) गदिमा स्मारक समिती.

युवक चळवळीत भाग:
महाविद्यालयीन जीवनापासूनच विद्यार्थ्यांच्या विविध चळवळीत सहभाग घेतला.१९७८ साली पुणे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्षपदी व शहर काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड झाली.या काळात झोपडपट्टी सुधारणा,आपदग्रस्तांना मदत,रक्तदान,वनसंवर्धन इत्यादी कार्यक्रम घेऊन सुशिक्षित बेकारांना स्वयंरोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न केला.

कामगार क्षेत्रातील कामगिरी:
१)मॅफकोच्या कामावरुन अन्यायाने काढून टाकलेल्या ५४ कामगारांना पुन्हा सन्मानाने कामावर घ्यायला लावले.
२)पुणे पी.एम.टी कामगारांना संघटित करुन पुणे म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँकेतील भ्रष्टाचार उघडकीस आणुन तेथील भ्रष्ट संचालक मंडळ बरखास्त करण्यास सरकारला भाग पाडले.
३)महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक मंडळात इंटक युनियन स्थापण्यात पुढाकार घेतला.
४)१९८१/८२ साली महाराष्ट्राचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान करणारा एम.एस.ई.बी. तील सबॉर्डीनेट इंजिनिअर्सचा संप मिटवण्यात यशस्वी मध्यस्थी केली.
५)सदगुरु जंगली महाराज ऑटोरिक्षा संघटनेच्या स्थापनेत पुढाकार घेऊन रिक्षा चालकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला.
६) “महाराष्ट्र कामगार साहित्य परीषदेच्या ” कामकाजात मोलाचा सहभाग.
७)कामगार कल्याण मंडळावर सभासद असताना सांगली जिल्हयातील माडगूळ या छोट्याश्या खेडयात ग्रामीण भागातील पहिले कामगार कल्याण केंद्र सुरु केले.

क्रिडाक्षेत्र :
नॅटस् क्लब,नवमहाराष्ट्र मित्र मंडळ,शिवाजी सेंटर,अमरज्योत तरुण मंडळ,संभाजी तरुण मंडळ इत्यादी मंडळांची स्थापना करुन फुटबॉल,कबड्डी,बुध्दीबळ इत्यादी खेळांच्या स्पर्धा घेतल्या व या खेळांच्या प्रसाराला गती आणली.

राजकीय कारकीर्द :
१९७५ पासुन काँग्रेसचे क्रीयाशील सदस्यत्व स्विकारुन त्या पक्षातर्फे १९८० व १९८५ साली विधानसभा निवडणुकीत सहभाग.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*