गडकरी, नितीन जयराम

जन्म : २७ मे, १९५७ (नागपुर)

नितीन गडकरी हे उद्योजक, राजकीय नेते आणि २०१४साली नागपूर विभागातून लोकसभेच्या जागेसाठी निवडून आलेले भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार व मोदी सरकारच्या कॅबीनेट मंत्रिमंडळात रस्ते वाहतूक व बांधकाम मंत्री आहेत.

यापूर्वी ते पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि नागपूर पदवीधर मतदारसंघातील विधानपरिषद सदस्य राहिले आहेत. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर समर्थक आणि सक्रीय कार्यकर्ते आहेत.

१९७६ मध्ये त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभाविप) कार्यकर्ता म्हणून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली. वयाच्या २३व्या वर्षी ते भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) चे अध्यक्ष झाले.

१९८९ मध्ये ते महाराष्ट्र विधान परिषदेवर प्रथम निवडून गेले.२० वर्षे ते विधान परिषदेचे सदस्य होते .

महाराष्ट्रात सन १९९५-१९९९ या काळात भा.ज.प.-शिवसेना युतीचे सरकार सत्तेत असताना ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. त्यांच्या मंत्रिपदाच्या काळात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह अनेक नवीन रस्ते व किमान ५५ उड्डाणपूल बांधले गेले. त्यांच्या या दूरदृष्टीचा फायदा आज मुंबईकर घेत आहेत. त्यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही जबाबदारी सांबाळली आहे.

२००९ साली त्यांची भारतीय जनता पक्षाचे ९ वे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्यावर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडले गेलेले ते दुसरे मराठी नेते ठरले. कुशाभाऊ ठाकरे हे पक्षाचे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष होते. वयाच्या केवळ बावन्नव्या वर्षी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झालेले नितीन गडकरी हे पक्षाचे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष होते .

२०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूका जिंकून देण्यात मोलाचा सहभाग आहे.

## Nitin Jayram Gadkari

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*