मराठी लेखक, कवी, कथाकार, गीतकार, समीक्षक, प्रवासवर्णनकार, नाटककार, भाषांतरकार…. म्हणजेच मराठी शब्दांशी नातं असणार्‍या साहित्यिकांविषयी…

नाईक, गुरुनाथ विष्णू

मराठीतील सुप्रसिद्ध रहस्यकथा लेखक. बाबुराव अर्नाळकरांप्रमाणेच त्यांनीही शेकडो रहस्यमय कादंबऱ्या लिहील्या.  त्यांच्या रहस्यकथांनी एकेकाळी संपूर्ण पिढीला वेड लावले होते. दर महिन्याला ते सरासरी शंभर पानांच्या ७-८ कादंबऱ्या ते सहज लिहित. प्रत्येक कादंबरीच्या चार ते पाच हजार प्रति खपत असत. १९७० ते १९८२ या […]

ठाकरे, श्रीकांत

श्रीकांत ठाकरे यांची ओळख महाराष्ट्राला संगीतकार म्हणून तर होतेच; पण ते स्वत: उत्तम व्यंगचित्रकार, लेखक, समीक्षक, पत्रकार आणि आयुर्वेदाचे अभ्यासक देखील होते. […]

जोशी, रामचंद्र भिकाजी (Sr)

संस्कृत व मराठी भाषा आणि व्याकरणाचे अभ्यासक रामचंद्र भिकाजी जोशी यांचा जन्म २१ जून १८५६ रोजी झाला. व्याकरणाची शिशुबोध, बालबोध व प्रौढबोध पुस्तके त्यांनी लिहिली आणि “मराठी भाषेची घटना”, “मराठी शब्दसिद्धी” असे ग्रंथही लिहिले. “अलंकार विवेक”, “बालबोध […]

जोशी, रामचंद्र भिकाजी (Jr.)

प्रवासवर्णनकार, समीक्षक रामचंद्र भिकाजी जोशी यांचा जन्म जुलै १९०३ मध्ये झाला. मजल दरमजल, वाटचाल आदी त्यांची स्थलवर्णनात्मक पुस्तके. काचेचे कवच, झम्मत हे त्यांचे कथासंग्रह तर “वाताहत” ही कादंबरी. “सोन्याचा उंबरठा” हे व्यक्तिचित्रणपर पुस्तक तर “साठवणी” […]

नगरकर, राम विठोबा

“रामनगरी या विनोदी अंगाने समाजदर्शन घडवणार्‍या अजरामर आत्मपर पुस्तकाचे लेखक राम विठोबा नगरकर. हे एक उत्कृष्ट विनोदी अभिनेते होते. राम नगरकर हे राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकात होते. तेथे सहज सांगितलेल्या किश्श्यांचे रुपांतर म्हणजे पुढे त्यांनीच लिहिलेले हे पुस्तक. […]

टेंबे, गोविंदराव

संगीतकार, थोर पेटीवादक आणि संगीतसमीक्षक गोविंदराव टेंबे यांचा जन्म ५ जून १८८१ रोजी झाला. “माझा संगीत व्यासंग” आणि “माझा जीवनविहार” ही त्यांची आत्मपर पुस्तके, तसेच त्यांच्या स्फुट लेखांचे संग्रहदेखील प्रकाशित झाले होते.  

खांडेकर,(प्रा.) भालचंद्र गजानन

जन्म : २८ जून १९२२ मृत्यू : २८ जून १९२२ लोकप्रिय गीतकार प्रा. भालचंद्र गजानन खांडेकर यांचा जन्म. “चंद्रप्रकाश”, “गंधसमीर” हे त्यांचे कवितासंग्रह. प्रेमातील विविध भावछटांचे उत्कट प्रकटीकरण त्यांच्या कवितांतून दिसतेच, परंतु दांभिकता, अन्यायाविरुद्ध बंड […]

1 2 3 30