फर्डे, अनिता हिराकांत

अनिता फर्डे यांनी महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून निराधार व निर्बल समाजघटकांसाठी अतुलनीय कार्य केले आहे. त्या नौपाडा प्रभाग समितीच्या माजी अध्यक्षा होत्या. ठाणे महानगरपालिकेवर निवडून आल्यानंतर सर्वप्रथम त्यांच्या हातात महिला व बालकल्याण विभागाची सुत्रे सोपविण्यात आली होती. व त्यांनीही आपली ही निवड सार्थ ठरविली. या पदाच्या माध्यमातुन त्यांनी गरीब व गरजू महिलांना स्वयंरोजगार मिळावा यासाठी शिलाई मशिन व घरघंटी वाटप केले. तसेच निराधार विधवा महिलांच्या मुलींच्या लग्नासाठी अनुदान उपलब्ध करून दिले. दारिद्रय रेषेखालील महिलांना संसारोपयोगी साहित्य तसेच नवीन साडयांचे त्यांनी वाटप केले. तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांचा बारावी परिक्षेत प्राविण मिळविलेल्या होतकरू विद्यार्थ्यांचा जंगी सत्कार करण्याची पध्दत अव्याहतपणे चालू आहे. गरजू परंतु कष्टाळु विद्यार्थ्यांना नियमीतपणे प्रतिवर्षी वह्या व शालेय साहित्याचे वाटप करणार्‍या अभिनव उपक्रमांचे आयोजन त्या करीत असतात. नागरिकांच्या या कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

महत्वाची विकासकामे-
१) प्रभागातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून खळे कंपाऊंड, दिपज्योती व सोनम सोसायटी पारवती निवास व मणीबाग परिसर, रावजी चाळ पाचपाखाडी, सत्यम शिवम सुंदरम सोसायटीच्या परिसरात पाईपलाईन त्यांच्या पुढाकारामूळे टाकण्यात आल्या.

२) आग्रा रोड ते ओपन हाऊस रस्त्याचे डांबरीकरण व मजबूतीकरण, अंजली परिसरातील मदनलाल धिंग्रा मार्गाचे डांबरीकरण, उदयनगर व खळे कंपाऊंड परिसरात मोडणार्‍या बहुतांशी रस्त्यांचे आमदार निधीतून डांबरीकरण, असे रस्तेविकासाचे उल्लेखनीय कार्य त्यांनी केले आहे.

३) मदनलाल धिंग्रा मार्ग व एल. बी. एस.
ार्ग या जंक्शनवर पेव्हर ब्लॉक, जिम्मी नागपुत्र योगीराज चौकात सी. सी. फेव्हर बसविणे, रावजी चाळ येथे प्रभाग सुधारणा निधीअंतर्गत गटार, काँक्रिटीकरणाद्वारे पायवाटा, वैतीवाडी येथील फुटपाथवर टाईल्स बसविणे, मदनलाल धिंग्रा मार्गावरील पदपथांचे नुतनीकरण, सर्विस रोड ते आनंद भुवन वरील, व अमरज्योती परिसरातील पदपथांचे आधुनिकीकरण, व गटार तसेच सार्वजनिक शौचालयांची बांधणी अशी अनेक कल्याणकारी कामे त्यांनी केली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*