प्रदीप वसंत नाईक

प्रदीप वसंत नाईक हे भारताचे एकोणीसावे वायुदल प्रमुख होते. अनेक सैनिकी कारवायांमध्ये व अतिरेक्यांच्या शोध मोहिमांमध्ये असाधारण अस शौर्य गाजवून आपल्या तिरंग्याची किर्ती अबाधीत राखल्यानंतर ते या सर्वोच्च पदावर आरूढ झाले. ही सर्व मराठी माणसांसाठी निश्चितच गौरवाची बाब आहे. […]

निफाडकर, (डॉ.) प्रमोद

अस्थमा झालेल्या रुग्णाना जगण्याची किंवा पूर्वीसारखं जीवन जगण्यासाठी उमेद आणि आत्मविश्वासाची भावना त्यांच्या मनात जागवणारी विख्यात अस्थमा व अॅलर्जी तज्ञ डॉ. प्रमोद निफाडकर.
[…]

रामदास पाध्ये

रामदास पाध्ये हे भारतामध्ये तसेच परदेशामध्येही या कलेमुळे नावाजले गेलेले हाडाचे कलाकार आहेत. त्यांनी बनविलेले व जीवंत केलेले अनेक बाहुले जगभरच्या रसिकांनी आपलेसे केले आहेत. टेलिव्हीजन मालिका, जहिराती, सिनेमे यांच्यातून सुध्दा ते आपल्या मनोरंजनासाठी भेटीस आले आहेत. आपल्या बाहुल्यांच्या कार्यक्रमांमधून बालविवाह, बालशिक्षण, ड्रग्स ची समस्या, जागतिक तापमानवाढ अशा महत्वाच्या मुद्दांवर ते नेहमीच भाष्य करतात. त्यांच्या जादुई बोटांचा स्पर्श झाला की त्या निर्जिव जीवांना नवं जीवनं मिळतं, ते रसिक जनांशी संवाद साधतात, त्यांना कधी हसवतात, रिझवतात, हास्याच्या कल्लोळामध्येही त्यांच्या जाणीवांचे पडदे खुले करून जातात. त्यांना प्रेम शिकव तात, संवेदनशिलतेचा मुलामा लावतात. मग तो लिज्ज्त पापड जहिरातीमधला बनी असो किंवा ‘दिल हे तुम्हारा’ मधील सर्वांना हवाहवासा वाटणारा बाहुला असो अशा निरनिराळ्या बाहुल्यांद्वारे रामदास पाध्ये प्रत्येक प्रयोगाला एखाद्या नवीन विचारांची, व कल्पनांची कुपी प्रेक्षकांसमोर उघडत असतात.
[…]

सुखात्मे, पां. वा.

मूळ संख्याशास्त्राचे विद्यार्थी असलेल्या सुखात्मे यांनी कृषीउत्पादनाच्या तसेच पोषण आणि आरोग्य या क्षेत्रात लक्षणीय भर घातली. कृषिसंशोधनासाठी, तसेच पिकासंबंधींच्या प्राथमिक माहितीचे अचूक विश्लेषण करण्यासाठी उपयुक्त ठरणार्‍या अनेक संख्याशास्त्रीय पध्दतींचा विकास त्यांनी केला. भारतीय कृषिसंशोधन परिषदेचे संख्याशास्त्रीय सल्लागार म्हणून कृषिसंशोधनाचा पाया भक्कम करण्यात त्यांचे योगदान महत्वाचे आहे. पिकांच्या संकरित जातींचा विकास करण्यासाठी लागणार्‍या संशोधनासाठी त्यांनी संख्याशास्त्राचा परिपुर्ण पायाच तयार केला. पुढे जागतिक अन्न आणि कृषिसंस्थेच्या संख्याशास्त्र विभागाचे संचालक म्हणुन काम करत असताना जगातील अन्न धान्य समस्येचा सखोल आभ्यास करण्याची संधी त्यांना मिळाली. त्यातूनच जगातील दोन तृतियांश जनता उपासमारीची आणि कुपोषणाची बळी असल्याचा प्रगत, श्रीमंतदेशांचा दावा दिशाभूल करणारा असल्याचे त्यांनी दाखवून दिले. पोषक आहार आणि रोगराई या दोन घटकांवर आरोग्य अवलंबून असले तरी ग्रामीण भागात आहारापेक्षाही रोगनिर्मूलनाला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सप्रमाण सिध्द केले. उत्तर आयुष्यात सुखात्मे यांनी आपले सर्व लक्ष पोषणाचा, विशेषतः भारतातल्या ग्रामीण भागातल्या पोषणाचा आभ्यास करण्यावर केंद्रित केले. आयुष्याच्या अखेरपर्यंत अध्ययन करणारे सुखात्मे यांनी देशातील संख्याशास्त्राच्या शिक्षणाला आणि अध्ययनाला चालना देण्यात महत्वाचा वाटा उचलला आहे.
[…]

नारळीकर, (डॉ.) जयंत विष्णू

जयंत नारळीकर हे त्यांच्या रोचक, रसदार, व सर्वांच्या मनाला भिडेल अशा लेखनशैलीत आकाशातील गुढ तारे व ग्रहांच्या गोष्टी सांगणारे लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. अनेक वैचारिक, वैज्ञानिक, तांत्रिक, काही समजायला सोप्या व काही तर लहान मुलांनाही वाचायला उपयुक्त अशा कथांमधून ते आपल्या सर्वांशी हितगुज साधत असतात.
[…]

काकोडकर, (डॉ.) अनिल

भारताला अणु उर्जा निर्मीतीमध्ये स्वयंपुर्ण बनविण्यामागे जे रथी व महारथी आहेत त्यांच्या यादीत सर्वात वरचा क्रमांक लागतो तो डॉक्टर अनिल काकोडकर यांचा.
[…]

शिरोडकर, (डॉ.) विट्ठल नागेश

डॉक्टर विट्ठल नागेश शिरोडकर यांचे महिलांसाठी असलेले अतुल्य योगदान पाहिले की मन भरून येते. मातृत्व हा प्रत्येक मातेसाठी व तिच्या कुटुंबियांसाठी सर्वात आनंदाचा, समाधानाचा, व आयुष्यभर जतन करून ठेवण्यासारखा क्षण असतो. शेवंतीच्या फुलांसारखी सुगंधी दरवळ आणणारा, व आनंदाच्या व हास्याच्या कारंज्यांनी घर भारून टाकणार्‍या या क्षणाला कोणाची नजर लागू नये यासाठी त्यांनी आपले सारे आयुष्य व कारकीर्द पणाला लावली होती. सतत होणारे गर्भपात या विषयावरील त्यांचे यशस्वी संशोधन, म्हणजे प्रत्येक गृहिणीसाठी तिच्या आईपणाची शाश्वती देणारे अमृतच ठरले. त्याकाळी शारिरीक गुंतागंतींमुळे गर्भपात होण्याचे प्रमाण फार मोठे व सामान्य होते.
[…]

कोसंबी, दामोदर धर्मानंद (डीडी)

असं म्हणतात की देवाने माणसाला काही विशीष्ठ विषयांमध्ये गती दिलेली आहे, व काहींमध्ये अधोगती. परंतु काही हिरे असे असतात, की जीवनातील अनेक क्षेत्रे व नाण्याच्या दोन्ही बाजू उत्तमपणे हाताळण्याची कला त्यांना उत्तम अवगत असते. एकाच गोष्टीला प्राधान्य द्यावे किंवा एकाच क्षेत्रात पुर्णपणे बुडून, त्यात भव्य दिव्य असे काहीतरी मिळवावे असली तत्वे त्यांना कधीच रूचत नाहीत. जीवनाच्या विवीधांगी विचारधारांमधे, मतप्रवाहांमधे, किंवा कलाकौशल्यांमधे सतत डुबकी मारण्याचा त्यांचा स्वभावच असतो व त्यांच्यासमोर पसरलेल्या विभीन्न व्यावसायिक, तांत्रिक, माहिती, संशोधन, कला, सामाजिक अशा अनेक क्षेत्रांच्या जाळ्यामध्ये ते तितक्याच तन्मयतेने व आत्मीयतेने काम करीत असतात. अशाच एका अत्यंत चळवळ्या व विज्ञानाच्या विवीध वाटा कोळून प्यायलेल्या संशोधकाचे नाव म्हणजे दामोदर कोसांबी.
[…]

करमरकर, नरेंद्र

भारतासारख्या महासत्ता बनण्याच्या वाटेवर असलेल्या देशाला त्याच्या गरीबीवर, व बेरोजगारीवर अंकुश ठेवण्यासाठी लोकसंख्या नियंत्रणाची जेवढी गरज आहे तेवढीच गरज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात होईल तेवढ्या खर्चाचा अपव्यय टाळण्याची व सुलभ तंत्रज्ञान जे सामान्य माणसाचा पैसा, वेळ व शक्ती या तिन्ही गोष्टींची बचत करेल असे तंत्रज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याची देखील आहे. विज्ञान व तंत्रज्ञान हे उपजत गुंतागूतीचे क्षेत्र असल्याने पैश्याची, व किचकट पध्दतींची बचत करून नव नवीन शोध लावणे व विवीध तंत्रांद्वारे ते लोकामध्ये रूजवणे हे तसे आव्हानच असते. पण हे आव्हान भारतामधील तरूण शास्त्रज्ञांनी आपल्या शोधांमधे लिलया पेललेले दिसते. नरेंद्र करमरकर हे या तरूण शास्त्रज्ञांमधले एक नसले तरी पैशांची होईल तेवढी बचत करून व आपल्या संशोधन कार्याला सहजतेची जोड देवून मगच त्या शोधाला आकार व गती प्राप्त करून देण्याचा पायंडा त्यांनीच या क्षेत्रात पाडला आहे. अंकगणिताच्या लाखो आकडेमोडी, करामती व हिशेब आपला संगणक चुटकीसरशी आपल्याला करून देत असला तरी जेव्हा हजारो घटकांची गुंतागूंत झालेला प्रश्न त्याला टाकला जातो तेव्हा त्याच घोडं हे अडतच!
[…]

जयकर, आत्माराम सदाशिव

आत्माराम सदाशिव जयकर यांनी प्राणीशास्त्राच्या विशाल व समृध्द जगतात जे काही नवे व वैज्ञानिकदृष्ट्या महत्वाचे शोध लावले, त्यांद्वारे त्यांनी सातासमुद्रापार मराठीचा झेंडा रोवण्यात, व सर्वसामान्य मुंबईकरांची व पर्यायाने सर्व भारतीयांची मान गर्वाने उंचावण्यात लक्षवेधक कामगिरी बजावली आहे. लहानपणापासून प्राणीप्रेम हा त्यांच्या स्वभावातील विलोभनीय पैलु होता. जयकरांच्या प्राणीप्रेमाला त्यांच्यामधील कुशाग्र बुध्दीच्या व कमालीच्या चिकीत्सक अशा संशोधकाची उत्तम जोड मिळाल्यामुळेच ते प्राणीशास्त्रासारख्या गुंतागुंतीच्या व आकलनक्षमतेचा कस लावणार्‍या क्षेत्रात त्यांच्या नावाची अजरामर मोहोर उमटवू शकले. मस्कत मध्ये त्यांनी 30 वर्षे वास्तव्य केले व तिथल्या रमणीय व नेत्रसुखद प्राणीखजिन्याचा मनमुराद आनंद लुटत त्यांनी अनेक नव्या जातींच्या रंगीबेरंगी मास्यांवर, व समुद्राच्या आतमधील असंख्य प्राण्यांवर संशोधन केले व ते प्राणी व्यवस्थितपणे त्यांच्या संग्रही जतन करून ठेविले. अरबी समुद्राच्या किनारी येणार्‍या तर्‍हेतर्‍हेच्या माशांचा पुरेसा साठा जमल्यावर ते सारे मासे त्यांनी ब्रिटनमधील नॅचरल हिस्टरी म्युझियमकडे सुपुर्द केले. प्राणी संशोधन क्षेत्रात अनोखी क्रांती घडवल्याबद्दल जयकरांनी शोधुन काढलेल्यांपैकी बावीस नव्या समुद्री मास्यांना त्यांचे नाव देवून त्यांच्या कार्याचा उचित सन्मान केला गेला.
[…]

1 2 3 6