बुलढाणा जिल्हा (किंवा बुलडाणा जिल्हा) हा महाराष्ट्र राज्याच्या अमरावती विभागात असून या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ९६८० चौ.किमी इतके असून लोकसंख्या २२,३२,४८० इतकी आहे. जिल्ह्याच्या पूर्व, पश्चिम व दक्षिण दिशेस अनुक्रमे अकोला जळगाव जालना परभणी हे जिल्हे आहेत. तर उत्तरेस नेमाड जिल्हा(मध्य प्रदेश) आहे. हा जिल्हा महाराष्ट्राच्या विदर्भात मोडतो.
विदर्भाच्या नकाशात जिल्ह्याचे स्थान
जिल्ह्याचे प्रशासकीय कार्यालय बुलढाणा शहरात असून ते १३ तालुक्यांशी राज्य महामार्गाशी जोडले गेले आहे. मुंबई ते हावडा हा महत्त्वाचा रेल्वे मार्ग तसेच पूर्व-पश्चिम भारतास जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ या जिल्ह्यातून गेला आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडील सर्व नद्या पश्चिम दिशेस वाहणार्या आहेत व त्या तापी नदीला जाऊन मिळतात तर दक्षिणेकडील नद्या पैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत.
जिल्ह्यात खामगाव, मलकापूर ही औद्योगिक शहरे आहेत. विदर्भातील अमरावती विभागातील हा जिल्हा अत्यंत कोरड्या व उष्ण हवेचा आहे. बुलढाण्यात अजिंठ्याच्या डोंगररांगा असून, सातपुड्याच्या रांगाही जिल्ह्याच्या सीमेवर आहेत. दख्खनच्या पठारापैकीच हा बेसॉल्टच्या खडकांनी बनलेला भाग असून, कठीण, काळ्या बांधाचा दगड,काळी भोर माती असणारा हा जिल्हा आहे.
कडक उन्हाळा आणि अतिशय थंडी असणार्या बुलढाण्यात पाऊस मात्र मध्यम पडतो. दक्षिणेकडे ७५ ते १०० सें.मी व उत्तर भागात ६० ते ७५ सें.मी.इतका पाऊस पडतो.
Leave a Reply