३१ डिसेंबर साठी शाकाहारीचे प्रकार

तंदुरी पनीर
साहित्य:- २०० ग्रा. पनीर, १/२ वाटी घट्ट दही, १ चमचा आले लसूण पेस्ट, १ चमचा कसुरीमेथी, लाल तिखट, १ चमचा गरम मसाला, चिमूटभर तंदुरी कलर, १ चमचा लिंबाचा रस, मीठ आणि अमूल बटर,
कृती :- पनीरचे चौकोनी मध्यम आकाराचे काप करावेत. पनीर व बटर सोडून वरील सर्व साहित्य एकत्र करावं. साहित्य चांगलं मिक्स करून पनीरच्या कापांना लावावं. ते दोन तास तसेच राहू द्यावं. स्टीलच्या सळईला पनीर लावून तंदूरमधे ठेवून ते भाजून घ्यावेत. तंदूर नसल्यास गॅसवर, धरून गोल फिरवत भाजून घ्यावेत. शेवटी बटर लावावं.

संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३

रोस्टेड पेपर टोमॅटो सूप
साहित्य:- तीन लाल भोपळी मिरच्या, तीन मोठे टोमॅटो, एक लहान कांदा, दोन:-तीन लसूण पाकळ्या, एक मोठा चमचा क्रीम, तीन कप व्हेज स्टॉक, एक चमचा लिंबाची किसलेली साल, एक मोठा चमचा लिंबाचा रस, मीठ, मिरपूड.
कृती:- ओव्हन २०० सेल्सिअसवर तापवून त्यात मिरच्या, लसूण, कांदा व टोमॅटो २० ते २५ मिनिटे भाजून घ्यावे. काळी झालेली साल काढून गार झाल्यावर मिक्सनरमध्ये पेस्ट करावी. गाळण्याने गाळून घ्यावी.
त्यात व्हेज स्टॉक, लिंबाची साल घालून ५ ते १० मिनिटे उकळावे. चवीला मीठ, मिरपूड, लिंबाचा रस व क्रीम घालून गरम गरम प्यायला द्यावे. आवडत असल्यास उकळताना उकडलेला पास्ता घालावा.

संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३

क्रीमी कॉर्न
साहित्य::- ४०० ग्रा. चा टिन स्वीट कॉर्न (क्रीम स्टाइल), २ वाटी कॉर्नफ्लोअर, मीठ, अर्धा चमचा सफेद मिरेपूड, १ वाटी पाणी आणि तळण्यासाठी तेल.
कृती :- स्वीट कॉर्न, १० चमचे कॉर्नफ्लोअर, मीठ, मिरे पूड आणि पाणी मिक्स करून मिश्रण दाटसर होईर्पयत शिजवावं, तेलाचा हात लावलेल्या ताटात हे मिश्रण ओतून पसराववं. गार होईर्पयत थांबवून मग शंकरपाळ्याच्या आकाराच्या वडय़ा पाडाव्यात. वडय़ा कॉर्नफ्लोर पावडरमधे घोळवून गरम तेलात सोनेरी रंगावर तळाव्यात.

संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३

लसूनी टिक्की
साहित्य- ६ मध्यम आकाराचे बटाटे, अर्धा कप लाल तिखट, पाव कप चिरलेली कोथिंबीर, ४ ते ६ तुकडे आलं, १ मध्यम आकाराचा कांदा, ६- ८ काजू, पाव कप पनीर, तळण्यासाठी तेल, चवीपुरते मीठ.
कृती – बटाटे उकडून चांगले चुरडून घ्या. त्यात मीठ घालून चांगले मळून घ्या. त्याचे दहा एकसारख्या आकाराचे गोळे करा. कांदा आणि आलं बारीक चिरून घ्या. कोथिंबीर बारीक चिरून घ्या. काजूची पावडर करून घ्या आणि ती कांदा, आलं, कोथिंबीर, लाल तिखट, मीठ आणि पनीर यात मिसळून घ्या. या मिश्रणाचेही दहा गोळे करा. बटाटय़ाच्या गोळ्यांमध्ये हे पनीरचे गोळे घाला. त्याला टिक्कीचा आकार द्या. कढईत तेल घालून ते तापल्यावर त्यात हे गोळे सोडून ते सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या. कागदावर पसरा. गरम असतानाच टोमॅटो सॉस किंवा पुदिना चटणीबरोबर खायला द्या.

संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३

नारळाच्या मलईचे कटलेट्स
साहित्य:- १ वाटी नारळाची (शहाळ्याची) मलई, १ वाटी उकडलेल्या बटाटय़ांचा लगदा , १/२ वाटी तांदळाचं पीठ, मीठ, १ चमचा तीळ, गरम मसाला, हिरव्या मिरच्यांचे काप, १ चमचा साखर, १ चमचा आमचूर पावडर आणि तळायला तेल.
कृती :- नारळाच्या मलईचे बारीक काप करावेत,. तेल सोडून वरील सर्व साहित्य चांगले एकत्र करून मिश्रण थोडं सैल ठेवावं. मिश्रणाचे चपटे कटलेट बनवून दोन्ही बाजूंनी तेल टाकून चांगले खरपूस शॅलो फ्राय करावेत.

संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३

चीज चिली पराठा
साहित्य :- १ वाटी किसलेलं चीज, २ चमचे चिली फ्लॅक्स, १ चमचा साखर, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, १ चमचा लसूण पेस्ट, १ वाटी, मळलेलं पीठ आणि गरजेनुसार बटर.
कृती :- मळलेलं पीठ व बटर सोडून इतर सर्व साहित्य एकत्र करून सारण तयार करून घ्यावं. मळलेल्या पिठाची पारी करून त्यात सारण भरावं. पारी पॅक करून पराठा लाटून घ्यावा. बटर सोडून पराठा दोन्ही बाजूंनी चांगला भाजून घ्यावा. भाजल्यानंतर तो त्रिकोणी कापावा.

संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३

मसालेदार लच्छा पराठा
साहित्य:- गव्हाचे पीठ एक वाटी, मैदा अर्धी वाटी, मीठ चवीनुसार, धने-जीरे पावडर, बडीशेप पावडर, मिरची पावडर, कसुरी मेथी गरजेनुसार, बटर गरजेनुसार.
कृती:- गव्हाचे पीठ, मैदा, मीठ, चार टी स्पून तेल एकत्र करा. घट्ट पीठ मळून घ्या. अर्धा तास ठेवा. नंतर चपातीसाठी घेतो तेवढा गोळा घ्या. पीठ लावून मोठी चपाती लाटा. त्यावर धने-जीरे-बडीशेप पावडर भुरभुरा. त्यावर तिकट, कसुरी घाला. कागदाच्या पंख्याप्रमाणे घड्या तव्यावर भाजून घ्या.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

व्हेज सिझलर
साहित्य:- अर्धा कप फ्लॉवरचे छोटे तुकडे, दोन गाजर, दोन बटाटे, एक सिमला मिरची, 8-10 फरसबीच्या शेंगा, दोन कांदे, दोन टोमॅटो बारीक चिरून, दोन अननसाच्या चकत्या, 3 सफरचंद, एक वाटी कोथिंबीर बारीक चिरून, लाल तिखट, सैंधव, मीठ व मिरेपूड, दोन चमचे टोमॅटो सॉस, तेल, दोन चमचे लसूण पेस्ट.
कृती:- सर्व भाज्या गार पाण्याने स्वच्छ धुऊन घ्याव्यात. गाजर, फरसबी, बटाटे, सिमला मिरची उभी कापावी. सफरचंद, अननस व कांदे बारीक चिरून घ्यावेत. उकळत्या पाण्यात गाजर, बटाटे, फरसबी, फ्लॉवरचे तुकडे अर्धवट शिजवून घ्यावेत. कढईत तेल गरम करून त्यात कांदे परतावेत. त्यातच लसूण पेस्ट परतून घ्यावी. सिमला मिरचीचे तुकडे व टोमॅटोच्या फोडी परताव्या व अर्धवट उकडलेल्या भाज्या नीट अलगद मिसळून घ्याव्यात. त्यात हलकेच सफरचंद व अननसाचे तुकडे मिसळून घ्यावेत.
सर्व्ह करताना तवा चांगला गरम करून त्यावर कोबीचे पान नीट पसरावे व त्यावर भाज्यांचे मिश्रण घालावे. एक चमचा लोण्याचा गोळा गरम तव्यावर घालून “सिझल’चा खमंग वास व वाफेसह डिश सर्व्ह करावी.

संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३

व्हेज शाही बिर्याणी
साहित्य:- २५० ग्रॅम बासमती तांदूळ, अर्धी वाटी मटार, अर्धी वाटी फ्लॉवर, पाव वाटी गाजर, पाव वाटी उभी चिरलेली फरसबी, ३ उभे चिरलेले कांदे, १ बटाटा, २ टॉमेटो, दीड टेबलस्पून आले:-लसूण पेस्ट, २ टेबलस्पून मिरची पावडर, १ टेबलस्पून गरम मसाला, २ टेबलस्पून बिर्याणी मसाला, अर्धा टेबलस्पून हळद, १ चमचा तूप, लाल, हिरवा खाण्याचा रंग, कोथिंबीर, काजू, तेल, चवीनुसार मीठ
कृती:- प्रथम चिरलेल्या भाज्या व मटार तळून घ्याव्या. नंतर कांदा तळून घ्याव्या. काजू तळून घ्यावे. ३ चमचे तेलात कांदा परतून घ्यावा. त्यात आले:-लसूण पेस्ट, बिर्याणी मसाला, गरम मसाला, मिरची पावडर, हळद टाकून एकजीव करावे. बारीक चिरलेला टॉमेटो टाकून तेल सुटेपर्यंत ढवळावे. मग तळलेल्या भाज्या, काजू टाकून दहा मिनिटे वाफवावे. चवीनुसार मीठ घालावे व बारीक चिरलेली कोथिंबीर पसरावी. दुसºया भांड्यामध्ये तयार झालेली भाजी व शिजवलेला भात यांचे दोन थर लावावे. वरून लाल, हिरवा रंग, खरपूस तळून घेतलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, काजू व तूप पसरवावे. पाच मिनिटे गॅसवर ठेवून वाफ काढावी.

संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३

सिझलर ब्राऊनी
गरम सिझलिंग प्लेटला बटर लावून त्यावर अननसाची चकती ठेवावी. त्यावर गरम ब्राऊनीचा तुकडा व व्हॅनिलाचा स्कूप ठेवावा. त्यावर आवडत असल्यास चॉकलेट सॉस (गरम) घालावा. गरमागरम प्लेटवर ही वाफाळती सिझलर ब्राऊनी खूपच टेस्टी लागते.

संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३

आंबा आइस्क्रीम
साहित्य:- दीड वाटी व्हिपिंग क्रीम, थंडगार, २ कप आंब्याचा रस(सध्या डब्यातील), पाऊण वाटी पिठी साखर, वेलची पूड (ऐच्छिक).
कृती:- मध्यम आकाराचे खोलगट काचेचे बाऊल घ्या आणि १/२ तास फ्रिजमध्ये गार करण्यास ठेवा.
गार झालेले काचेचे बाऊल घेऊन त्यात गार व्हिपिंग क्रीम घाला आणि फेटा. क्रीम थोडे फ्लफी व्हायला लागले की २ ते ३ बॅचमध्ये साखर घालून फेटत राहा. क्रीम व्यवस्थित फ्लफी झाले की फेटणे थांबवावे. यामध्ये आता थंड आंब्याचा रस घालून लाकडी कालथ्याने फोल्ड करा. वेलची पूड घालणार असल्यास आता घाला. किंवा त्याऐवजी तुम्हाला मँगो इसेन्स घालायचा असल्यास २-३ थेंब घाला. नीट मिक्स करा. जर तुमच्याकडे आइस्क्रीम मशीन असेल तर त्यात हे मिश्रण घालून घोटून घ्या.
जर आइस्क्रीम मशीन नसेल तर हे मिश्रण फ्रीझर सेफ प्लास्टिक किंवा मेटलच्या भांडय़ात घाला. साधारण २ तास हे मिश्रण फ्रिजमध्ये ठेवा. नंतर फ्रीझरमधून काढा. मिक्सरमध्ये फिरवा. असे १-२ वेळा करून परत फ्रीझरमध्ये ठेवा. आइस्क्रीम सेट झाले की सव्‍‌र्ह करा.

संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३

आइस्क्रीम कॉकटेल
साहित्य:- २ स्कूप वॅनिला आइस्क्रीम, १ स्कूप मँगो आइस्क्रीम, १/४ वाटी स्ट्रॉबेरी क्रश, थोडे आंब्याचे तुकडे
डेकोरेशनसाठी:- ४ ते ५ पिस्ता, बदाम, २ चमचे स्ट्रॉबेरी जेलीचे तुकडे, २ चमचे ग्रीन जेलीचे तुकडे, २ चमचे टूटीफ्रूटी, २-३ ग्लेझ चेरीज (पाकवलेल्या), १ वेफर बिस्कीट.
कृती:- मध्यम आकाराचा उभा ग्लास घ्यावा. त्यात तळाला थोडा स्ट्रॉबेरी क्रश घालावा. त्यावर वॅनिला स्कूप घालावा. त्यावर जेलीचे तुकडे, ड्रायफ्रूट्स आणि थोडा अजून स्ट्रॉबेरी क्रश घालावा. फळांचे तुकडे घालावे. थोडे परत वॅनिला आइसक्रीम घालून वर मँगो आइस्क्रीमचा स्कूप घालावा. सजावटीसाठी १-२ पिस्ता, १ बदाम, टूटीफ्रूटी आणि चेरीज लावावे. कडेने वेफर बिस्कीट खोचून लगेच सव्‍‌र्ह करावे.

संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३

फालुदा
साहित्य:- ८ स्कूप्स वॅनिला आइसक्रीम, १ ते दीड वाटी रोझ सिरप, २ चमचे सब्जा बी, १/२ लिटर थंड दूध
१ पॅकेट फालुदा शेवया, ४ चमचे ड्राय फ्रूट्स, छोटे तुकडे, स्ट्रॉबेरी फ्लेवरची जेली, १/२ वाटी टूटी-फ्रूटीचे तुकडे
सजावटीसाठी चेरी.
कृती:- फालुदा बनवायच्या किमान ५ तास आधी जेली बनवून फ्रिजमध्ये सेट करण्यास ठेवावी. जेली बनवण्यासाठी जेली पावडर आणून पाकिटावरील कृती वाचून जेली बनवावी. सब्जा बी फालुदा बनवण्याच्या किमान २ ते ४ तास आधीच १ वाटी पाण्यात भिजवून ठेवाव्यात. १ लिटर पाणी उकळवावे त्यात फालुदाच्या शेवया घालून ४ ते ५ मिनिटे शिजवाव्यात. गरम पाणी काढून टाकावे व थंड पाणी घालून दुसऱ्या भांडय़ात थंड पाण्यासकट ठेवून द्यावे. दूध आणि रोझ सिरप मिक्स करून घ्यावे. गोडपणा जर कमी वाटत असेल तर अजून थोडे रोझ सिरप घालावे. ढवळून तयार ठेवावे. फालुदा बनवायच्या वेळेस ४ ग्लास घ्यावे. त्यात भिजवलेले सब्जा बी, जेली, शिजवलेल्या शेवया, आइस्क्रीमचा १ स्कूप, दूध आणि परत त्यावर १ स्कूप वॅनिला आइस्क्रीम घालावे. ड्रायफ्रूट्स आणि चेरीने सजवावे. लगेच सव्‍‌र्ह करावे. सव्‍‌र्ह करताना ग्लासमध्ये १ स्ट्रॉ आणि चमचा घालून द्यावा.
टीप : फालुदाच्या मधल्या लेयरमध्ये स्ट्रॉबेरी, द्राक्षं, अननसाचे तुकडे इत्यादी आंबटगोड चवीची फळे घातल्यास फालुदा दिसायला आकर्षक तसेच चवीला स्वादिष्ट लागतो.

संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३

जिंजरमिंट मॉकटेल
साहित्य : एक जुडी पुदिन्याची, आल्याचे तुकडे सोलून काप करून घेतलेले, दोन कप साखर, चार
लिंबाचा रस, शेंदे मीठ, दोन लहान चमचे भाजलेले जिरे, १०-१२ काळे मिरे, २, लवंगा, १ लहान तुकडा तेजपान, दोन मोठे चमचे मध व चुरा केलेला बर्फ.
कृती : सर्व प्रथम पुदिन्याच्या पानांना चांगल्याप्रकारे धुऊन घ्यावे. त्यात आलं, काळेमिरे, जिरं, मीठ, लवंगा, तेजपानं आणि कुटलेला बर्फ घालून मिक्सरमधून फिरवून घ्यावे. पाणी घालून घालून गाळून घ्यावे. जर मध आवडत असेल तर ते घालून थंड थंड सर्व्ह करावे. हे पेय तुम्ही बनवून सुद्धा ठेवू शकता.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*