उपवासाचा पिझ्झा बेस

साहित्य: ३/४ कप उपवासाची भाजणी, १ टिस्पून ड्राय यिस्ट, १/२ टिस्पून साखर, १/२ टिस्पून मिठ, १/४ कप कोमट पाणी, थोडी भाजणी पिझ्झा लाटताना.

कृती:
१) एका बोलमध्ये २ टेस्पून कोमट पाणी घ्यावे, त्यात १ टिस्पून ड्राय यिस्ट व १/२ टिस्पून साखर घालून मिक्स करावे. हे मिश्रण १० मिनीटे झाकून ठेवावे. ५ ते १० मिनीटात हे मिश्रण फेसाळेल.
२) ३/४ कप भाजणी वाडग्यात घेऊन हे फेसाळलेले मिश्रण त्यात घालावे, मिठ आणि थोडे तेल घालावे. गरजेनुसार थोडे कोमट पाणी घेऊन पिठ एकदम मऊसर मळून घ्यावे (साधारण ७-८ मिनीटे) . मळलेले पिठ एकदम इलेस्टिक झाले पाहिजे. मळलेल्या पिठाच्या गोळ्याला तेलाचा हात लावून एका काचेच्या किंवा इतर कोणत्याही, बर्‍यापैकी खोलगट भांड्यात ठेवून वरून निट झाकावे. उबदार ठिकाणी हे भांडे दिड तास ठेवावे म्हणजे पिठ फुगून येईल.
३) मळलेले पिठ व्यवस्थित फुगले कि ओव्हन ४८० F (२५० C) वर प्रिहीट करावे. यिस्टमुळे पिठात हवेचे बुडबुडे तयार होतात, म्हणून पिठ परत एकदा निट मळून घ्यावे . मळताना थोडा तेलाचा हात लावावा.
४) सुकी भाजणी भुरभूरवून जाडसर पोळी लाटावी . काट्याने पूर्ण पोळीवर टोचावे म्हणजे बेक करताना फुगणार नाही. पोळीला वरून थोडे तेल लावावे.
५) साधारण ६-८ मिनीटे बेक करून घ्यावे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*