लाडूच्या काही कृती

दिवाळीचा फराळ हा आहारपरंपरेचा परिपाक आहे. सणांचा संबंध खाद्यसंस्कृतीशीही आहे. मात्र खाण्यापिण्याची चंगळ असा त्याचा अर्थ नसून, ऋतूमधील वातावरणाला अनुरूप आणि त्या वातावरण बदलांमुळे शरीरामध्ये संभवणाऱ्या विकृतींना प्रतिबंधक असा आहार घेण्याचे मार्गदर्शन आरोग्यपरंपरेने केले आहे. दिवाळी प्रसिद्ध आहे फराळासाठी! रुचकर स्वादाचे, वेगवेगळ्या आकाराचे, विविध रंगरूपाचे एकाहून एक सरस असे जिभेला लालसावणारे फराळाचे पदार्थ हे आपल्या दिवाळी सणाचे वैशिष्टय़ म्हणायला हवे. या फराळातील एक आवडता पदार्थ म्हणजे लाडू.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

लाडूच्या काही कृती
नवधान्यांचे पौष्टिक लाडू
साहित्य:- प्रत्येकी १00 ग्रॅम मूग डाळ, उडीद डाळ, हरभरा डाळ, गहू, तांदूळ, नाचणी, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, ७५0 ग्रॅम पिठीसाखर, वेलची आणि जायफळाची पूड, ८00 ग्रॅम तूप आणि १ वाटी दूध.

कृती:- सोयाबीन सोडून सर्व डाळी आणि धान्य खमंग भाजावं. सोयाबीन कमी भाजावी. भाजल्यावर सर्व एकत्र करून दळून त्याचं पीठ करावं. कढईत तूप घालून हे पीठ किंचित भाजावं. भाजल्यावर दुधाचा हबका मारावा. गॅस बंद करावा. पीठ कोमट झाल्यावर त्यात साखर, वेलची आणि जायफळाची पूड घालून मिश्रण चांगलं मिसळावं. नंतर मिश्रणाचे लाडू वळावेत. हे लाडू अतिशय पौष्टिक असतात.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

बेसनचे लाडू
साहित्य:- १/२ किलो चणा डाळीचे जाडसर पीठ१ वाटी वनस्पती तूपदीड वाटी साखर ५-६ वेलच्या थोडं जायफळ २ चमचे चारोळी १५-२० बेदाणे. वेळ: १ ते २ तास.

कृती: सर्व प्रथम कढईत तूप तापवा. तूप तापल्यावर डाळीचे पीठ घालून सतत परतत राहा. परतताना चमच्याने पीठ दाबून पिठाच्या गुठया मोडत राहाव्यात. मंद आचेवर २०-२५ मिनिटे बेसन परतावे. बेसन भाजत आले कि बेसन मधून तूप सुटू लागते. परतताना तूप चमकू लागले व बेसन लाल रंगाचे होऊन खमंग वास सुटला कि बेसन ताटात ओतावे. बेेसन थंड झाल्यावर साखर मिक्सरमध्ये दळून मिसळावी. तसेच वेलची-जायफळ पाउडर, चारोळी घालून बेसन हाताने मळावे व एकेक लाडूला एक बेदाणा लावून लाडू वळावेत. तयार लाडू खाण्यासाठी सर्व्ह करा. नोंद:कोणत्याही लाडवाचा भाजा भाजताना वनस्पती तुपा ऐवजी साजूक तूप घेतल्यास कमी लागते व लाडू खमंग होऊन मऊ राहतात.

रव्याचे लाडू
साहित्य:-१/२ किलो बारीक रवा१/२ किलो तूप१/४ किलो पिठी साखर१ चमचा वेलची व जायफळ पूड १/४ किलो सुखे किसलेला खोबरं, शोभेसाठी मनुका किंवा काजू मीठ चवीनुसार पाणी, वेळ: २ तास.

कृती: प्रथम खोबरं लालसर भाजून घ्या. १०० ग्राम तुपात रवा लालसर भाजून घेणे. भाजलेला रवा थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर, जायफळ, वेलचीपूड, भाजलेलं खोबरं, मनुका आणि काजू घालून मिश्रण एकत्रित करावे. उरलेले तूप गरम करुन त्या मिश्रणात ओतावे आणि मिश्रण एक करावे. मिश्रण थोडे थंड झाल्यास लाडू वळण्यास घ्यावे. तयार झालेल्या रव्याचे लाडू सर्व्ह करा.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

मोतीचूर लाडू
साहित्य :- २५० ग्रॅम डाळीचे पीठ (मोठ्या अडीच वाट्या), २५० ग्रॅम तूप,खायचा केशरी किंवा बुंदी कलर १/४ चमच ,बदाम २ टे.स्पून, टरबूज मगज ( टरबूज बिया ) २ टे. स्पून, विलायची पावडर अर्धा टी. स्पून, दीड वाटी पाणी (पीठ भिजवण्यासाठी),
साखरेचा पाक बनविण्यासाठी :- ३५० ग्रॅम साखर, जेव्हढी साखर तेव्हढेच पाणी.
कृती :- डाळीचे पीठ मैद्याच्या चाळणीने चाळून घ्या. नंतर त्यात १ टे. स्पून कडकडीत तुपाचे मोहन व बुंदी कलर घालून पीठ भिजवावे. गुठळी राहू देऊ नये. भज्याचा पिठाइतपत असावे. नंतर कढईत तूप तापत ठेवावे व बुंदीच्या झाऱ्यावर वरील पीठ थोडे घालून झारा ठोकून बुंदी पाडाव्या.लालसर रंगावर आल्या की बुंदी काढाव्या अशा सर्व बुंदी पाडून घ्याव्या. दुसरी कडे कढईत साखर आणि पाणी घालून, साखरेत पाणी घालून एकतारीपेक्षा जरा जास्त घट्ट असा पाक करावा.बुंदी थोड्या थंड झाल्यावर पाकात टाकाव्या. नंतर या मिश्रणात बदाम काप, टरबूज मगज, आणि विलायची पावडर घालावी, मग हे मिश्रण थोडे थंड झाले कि, किंवा बुंदीत पाक मुरल्यावर लाडू वळावे.तुमचे मोतीचूर चे लाडू तयार आहेत.

टिप्स :- बुंदी पाडताना झारा प्रत्येक वेळी पाण्याने साफ करून घ्यावा. झाऱ्यावर दुसऱ्या चमच्याने ठोकत राहून बुंदी पाडावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*