खजूर

जायदी खजूर आणि पिड खजूर असे दोन प्रकारचे खजूर बाजारात उपलब्ध असतात. जायदी खजूर हा उत्तम प्रतीचा खजूर असून तो पिवळा-सोनेरी व भरीव असतो, तर िपड खजूर लाल किंवा काळसर लाल अधिक रसदार, चविष्ट आणि गुणांनी अधिक श्रेष्ठ असतो. खजूर वा खारीक दोन्हींमध्ये पौष्टिकमूल्य सारखेच असते. खजुरामध्ये शरीराला पोषक ठरणारी अनेक नसíगक अन्नद्रव्ये आहेत. कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस व ‘अ’ व ‘क’ जीवनसत्त्व, प्रथिने, खनिजे, तंतूमय पदार्थ आणि पिष्टमय पदार्थ हे सर्वच घटक खजुरामध्ये असतात. खजुराला ‘पूर्ण आहार’ असेही संबोधिले जाते व त्यामुळेच फार पूर्वीपासून सहारा वाळवंटात त्याला रोटीइतकेच महत्त्वाचे मानले जाते. खजुरामध्ये ग्लुकोज व फ्रुक्टोज स्वरूपातील नसíगक साखर असते. ही साखर नसíगक असल्यामुळे शरीराला बाधक नाही. म्हणूनच बाजारातील साखरेऐवजी खजुराचा वापर करावा.

खजुरातील साखर रक्तात लगेच शोषली जाऊन शरीराला ऊर्जा मिळते. खजूर नुसता किंवा लोण्याबरोबर खावा. खजुराची नीरा ही फार पौष्टिक असून ती ताजी पिणेच योग्य आहे. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून खजूर हे फळ मधुर पौष्टिक, बलवर्धक, श्रमहारक, तृप्तिदायक, पचनास जड आणि वीर्यवर्धक आहे. अनेक स्त्रियांमध्ये रक्तक्षय (अॅवनिमिया) हा आजार आढळून येतो. या आजारामध्ये मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे विस्मरण, चक्कर येणे, नराश्य येणे ही लक्षणे दिसतात. अशा स्त्रियांनी सहा महिने ते वर्षभर आहारात ७-८ खजूर दररोज सेवन करावे. हमखास गुण येतो. किरकोळ शरीरयष्टीच्या लोकांनी जाडी वाढवण्यासाठी खजुराचे नियमित सेवन करावे. स्थूल लोकांनी खारिक खावी. लहान बालकांच्या सुदृढतेसाठी दररोज एक खजूर दहा ग्रॅम तांदळाच्या धुवणात वाटावा. त्यात थोडे पाणी घालून ते मिश्रण लहान बालकांना दोन-तीन वेळा द्यावे. त्यामुळे बालके धष्टपुष्ट होतात. मलावस्तंभाचा जुनाट त्रास असेल तर ५-६ खजूर रात्री भिजत घालून सकाळी ते पाणी चांगले ढवळावे व खजूर कुस्करून तयार झालेले पाणी प्यावे. खजूर रेचक असल्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. आतडय़ांच्या विकारामध्ये खजूर अत्यंत गुणकारी आहे. कारण आतडय़ांमध्ये आवश्यक असणाऱ्या विशिष्ट जंतूंची वाढ खजूर सेवनाने होते. त्यामुळे आंत्रव्रण, आम्लपित्त अशा विकारांमध्ये खजूर उपयोगी पडतो. खजुरामुळे शरीराला ऊर्जा मिळते, कारण खजुरात नसíगक साखर पुष्कळ प्रमाणात असते. त्यामुळे शरीराला उष्णता व ऊर्जा देण्याचे कार्य खजूर करते.

नियमितपणे खारीक व गरम दूध घेतल्यास शक्ती वाढते. शरीरात नवीन रक्त निर्माण होते.
अनेक स्त्रियांना कंबरदुखीचा त्रास होत असतो. अशा वेळी चार ते पाच खजूर व अर्धा चमचा मेथी दोन ग्लास पाण्यात उकळावी. हा काढा निम्मा होईपर्यंत उकळावा. नंतर गॅस बंद करून कोमट झाल्यावर तो पिण्यास द्यावा. या काढय़ाने कंबरदुखी थांबते.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*