साहित्य:- २ मध्यम आकाराची लाल गाजरे (केशरी नकोत), १ मोठे बीट, २ मध्यम टोमॅटो, १ छोटा पांढरा कांदा, चवीप्रमाणे मीठ भेळेच्या चटण्या:- खजुर-चिंचेची चटणी, पुदिना-कोथिंबीरीची चटणी, लसूण-लाल सुक्या मिरच्यांची चटणी.
सजावटीसाठी:- मटकी शेव, बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती:- गाजर व बीट स्वच्छ धुवून कच्चेच किसून घ्यावे. टोमॅटो व कांदा धुवून बारीक चिरून घ्यावा. एका भांड्यात गाजर, बीटचा किस आणि चिरलेला कांदा, टोमॅटो हलक्या हाताने एकत्र करून घ्यावे. त्यात चवीनूसार मीठ व भेळेच्या चटण्या घालाव्यात. एका बोलमध्ये काढून घेऊन त्यावर मटकी शेव व कोथिंबीर भुरभुरवून खाण्यास द्यावे. भेळेच्या चटण्या तयार असतील आणि किसण्याचा व चिरण्याचा वेग जास्त असेल तर ५-७ मिनीटांपेक्षा अधिक वेळ लागत नाही. साध्या नायलॉन शेवेपेक्षा मटकी शेव वापरल्याने वेगळीच छान चव येते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply