साहित्य:- १ कप ज्वारीचे पीठ, १ टिस्पून मैदा, १/२ टिस्पून तीळ, १/२ टिस्पून जीरे, अर्धवट कुटलेले १/४ टिस्पून ओवा, १ टिस्पून लाल तिखट, १/४ टिस्पून हिंग, साधारण १/२ कप पाणी, १/२ टिस्पून मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती:- ज्वारीचे पीठ मोठ्या सुती रुमालात बांधून पुरचुंडी बनवावी. कुकरमध्ये तळाला १ इंच पाणी घालावे. त्यात भोकाची ताटली ठेवावी. त्यावर कुकरच्या आतील डबा ठेवून त्यात पिठाची पुरचुंडी ठेवावी. कुकरच्या ३-४ शिट्ट्या होवू द्याव्यात. गॅस बंद करावा. कुकरचे प्रेशर कमी झाले कि कुकर उघडून पुरचुंडी काढावी. त्यातील पीठ जरा घट्ट झाले असेल. हाताने गुठळ्या फोडून चाळून घ्यावे. त्यात मैदा, तीळ, जीरे, ओवा, लाल तिखट, हिंग आणि मीठ घालून मिक्स करावे. थोडे थोडे पाणी घालत मध्यमसर मळावे. चव पाहून लागल्यास मीठ घालावे. खूप घट्ट किंवा खूप सैलसुद्धा नको. चकली यंत्राला आतून तेलाचा हात लावावा. चकलीची चकती बसवून साच्यात पीठ भरावे. कढईत तेल गरम करून आच मध्यम करावी. चकल्या पाडून बदामी रंगावर तळाव्यात. तळलेल्या चकल्या कागदावर काढून गार होवू द्याव्यात. नंतर हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात.
टीपा:- ज्वारीच्या पिठाला चिकटपणा कमी असतो म्हणून चकल्या पाडताना त्या तुटण्याची शक्यता असते. म्हणून पीठ थोडे घट्ट वाटले तर पिठाला थोडा पाण्याचा हात लावून मळावे. चकलीची जाड भोकाची चकती घ्यावी. बारीक भोकाच्या चकतीमुळे चकल्या पडतानाच तुटतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply