आजचा विषय इडली भाग दोन

इडली खाण्याचे फायदे
इडलीमध्ये तांदूळ आणि उडीदडाळ एकत्र केलेली असते. यामुळे इडली ही कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनचे चांगले स्रोत असते. इडली बनवताना तांदूळ व उडीदडाळीला फमेंट केले जाते. ज्यामुळे त्यामधील प्रोटीन बायोवेलेब्लिटी आणि व्हिटॅमिन बी वाढते. इडलीमध्ये वापरले गेलेली डाळ आणि तांदूळाचे मिश्रण एमिनो अॅसिडचे चांगले स्त्रोत असते. इडली खुप पौष्टीक असते. इडली खाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही इडली पोट खाल्ली तरी तुम्हाला कमी प्रमाणातच कॅलरीज मिळतील, कारण विशेष म्हणजे इडलीमध्ये फक्त ३९ कॅलरीज असतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

इडली चाट
साहित्य:- ३ ते ४ इडल्या (उरलेल्या असल्यास अधिक उत्तम, ताज्या नकोतच), पापडी १/२ वाटी, १ कांदा, चिंचेची गोड चटणी, दही, बारीक शेव, हिरव्या मिरच्या २, चाट मसाला ,लाल तिखट , जिरे पूड, कोथिंबिर आणि बारीक शेव, आवडत असल्यास पुदीना किंवा कोथिबीर चटणी
कृती:- इडलीचे बारीक चौकोनी आकाराचे तुकडे करून घ्यावेत. तेल चांगले तापवून हे तुकडे सोनेरी रंगावर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यावेत. पेपवरवर निथळावेत. गार झाल्यानंतर एका बशीत हे तुकडे, त्यावर पापडीचे तुकडे, बारीक चिरलेला कांदा, त्यावर दही, हिरवी चटणी घालावी. नंतर आवडीप्रमाणे चाट मसाला, लाल तिखटाची पूड, जिरे पावडर, चवीनुसार मीठ व वरून बारीक शेव घालून सजवावे. वरून चिंचेची गोड चटणी घालून कोथिबीर घालावी व लगेच खायला द्यावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

साबुदाणा इडली
साहित्य:- एक वाटी नायलॉन साबुदाणा, एक वाटी इडली रवा , दोन वाट्या आंबट दही ,सव्वा वाटी पाणी, पाऊण वाटी ओल्या नारळाचा चव, २ चमचे फोडणीसाठी तेल, एक चमचा उदडाची डाळ, मोहरी, दोन हिरवी मिरची (बारीक चिरून) , कढीपत्त्या ५-६ पाने, काजू पाकळ्यांचे तुकडे, बारीक चिरलेली कोथिंबीर, मीठ चवीनुसार.
कृती:- रात्री एका पातेल्यात नायलॉन साबुदाणा, इडली रवा आंबट दह्यात सव्वा वाटी पाणी व चवीपुते मीठ मीठ घालून रात्रभर भिजत घालून ठेवा. आंबट दहयात रात्रभर भिजून आंबल्यामुळे साबुदाणा व इडली रवा यात सगळे दही व पाणी शोषले गेले असेल. पीठ जर जास्त घट्ट झाल्यासारखे वाटत असेल तर थोडेसे पाणी घालून धावला. नेहमीच्या उडीद डाळीच्या इडळीच्या पिठापेक्षा हे पीठ थोडे जास्त पातळ ठेवा. फ्रायपॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी टाका. मोहरी तडतडल्यावर काजू पाकळ्यांचे तुकडे घालून ब्राऊन रंगावर तळून घ्या ,मग कढीपत्त्याची पाने घाला ,उडदाची डाळ घालून सॉरी रंगावर परतून घ्या. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून काही सेकंद परतून घेऊन ही तडका फोडणी इडलीच्या पिठावर ओतून त्यात ओल्या नारळाचा चव घालून डावाने पीठ ढवळून चागले मिक्स करा. इडलीच्या स्टँडला तेलाचा हात लावून चमच्याने साच्यात इडलीचे पीठ घाला. इडली कुकरमध्ये १०-१५ मिनिटे इडल्या उकडून घ्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

इडली पिझ्झा
इडलीसाठी साहित्य:- १ कप रवा, १/२ कप दही, चवीनुसार मीठ आणि १ पॅकेट फ्रूट सॉल्ट.
सजावटीसाठी साहित्य:- १ मोठा कांदा चिरलेला, १ मोठी सिमला मिरची बारीक चिरलेली, १/२ कप कॉर्न उकळलेले, थोडसे पनीर किसलेले, १/२ चमचा चिली फ्लेक्स, २ मोठे चमचे टोमॅटो कॅचअप आणि २ छोटे चमचे चिली गार्लिक सॉस.
कृती : रव्यात मीठ व दही घालून फेटून घ्यावे. इडलीच्या भांड्याला तेलाचा हात लावून मिश्रणात फ्रूट सॉल्ट घालून इडल्या तयार कराव्या. नंतर इडल्या गार झाल्यावर वरून सॉस लावून चिली फ्लेक्स, चिली सॉस, चिरलेल्या भाज्या, कॉर्न व पनीर टाकून सर्व्ह करावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

चीज इडली
साहित्य:- दोन वाटया इडली रवा, एक वाटी उडीद डाळ, दहा-बारा मेथी दाणे, अर्धी वाटी किसलेलं चीज
एक चमचा मिरपूड, एक चमचा लाल सुक्या मिरचीच्या बिया, थोडं लोणी, मीठ चवीनुसार.
कृती:- डाळ आणि रवा भिजत घालून त्या दोन्हीत थोडे थोडे मेथी दाणे घालावे.
उडीद डाळ वाटून घ्यावी. डाळ वाटून होत आली की पाणी निथळून रवा घालून वाटावी.
त्यात मीठ घालून ती मोठया पातेल्यात झाकण ठेवून भिजत घालावी. सकाळी कुकरमध्ये पाणी उकळत ठेवून, इडली पात्राच्या वाट्यांना तेलाचा हात लावून प्रेत्येकात इडली पीठ टाकून इडल्या तयार कराव्यात. तयार झालेल्या प्रत्येक इडलीला लोणी लावावं. वर चीज पेरून त्यावर मिरपूड आणि मिरचीचा चुरा पेरून १८० सेंटीग्रेडवर तापलेल्या ओव्होनमध्ये साधारण तीन-चार मिनिटं चीज वितळेपर्यंत ठेवाव्या. गरम गरम खायला दयाव्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

रवा इडली
साहित्य: एक वाटी अख्खी उडीद डाळ (साल नसलेली), अडीच वाट्या जाड रवा, मीठ, एक टेबलस्पून तेल.
कृती:- उडीद डाळ किमान पाच तास पाण्यात भिजवा. नंतर डाळ वाटून घ्या व पाणी घालून पातळ करा. एका कढईत रवा भाजून घ्या पण रंग बदलू देवू नका. रवा कोमट झाल्यावर वाटलेल्या डाळीच्या मिश्रणात घाला. कालवून घ्या व पाण्याचं प्रमाण गरज वाटल्यास याचवेळेस वाढवा. मिश्रण पातळ असले पाहीजे कारण रवा नंतर पाणी शोषून घेतो. चवीनुसार मीठ व एक टेबलस्पून तेल घाला. नीट मिसळून उबदार जागी ठेवून द्या. साधारण आठ ते दहा तासात पीठ फुगून येते. मिश्रण अजिबात ढवळायचे नाही. इडलीपात्राला तेलाचा हात लावून घ्या व चमच्याने वरवरचे पीठ घेऊन पात्रात घाला.
इडल्या वाफवून काढाव्यात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

इडली विथ पिझा टेस्ट
साहित्य- एक भांडे तांदळाचा रवा, एक चमचा उडीद डाळ, एक चमचा मुगाची डाळ, एक चमचा चणाडाळ, एक चमचा पोहे, पिवळय़ा कणसाचा किसलेला कीस, एक वाटी पालक, आले, मिरची, पिझाचा मसाला, दीड चमचा तेल, दोन चमचे बटर, मक्याचे दाणे उकडलेले अर्धी वाटी, दोन टमाटे किसलेले, चिली फ्लेक्स, एक चमचा, आमचूर पावडर, एक चमचा, दोन चमचे टमाटो सॉस, अर्धा चमचा गरम मसाला, मीठ.
कृती- तांदूळ, डाळी व पोहे वेगवेगळे भिजत घालावेत व दोन तासांनी सगळय़ा डाळी व तांदूळ वाटून घ्याव्यात. पालक धुऊन घेणे व तो मिक्सरमध्ये घालणे. त्याची पेस्ट करून त्या मिश्रणाची (डाळी व तांदळाचे) घालावी. किसलेले कणीस घालावे. मीठ घालावे. आले, लसूण, मिरची घालावी व सर्व एकत्र करून त्यात थोडे मीठ घालावे. फट्रसॉलट घालून छोटी इडली करावी.
मसाल्यासाठी – दोन चमचे तेल, दोन चमचे बटर, पाव वाटी मक्याचे उकडलेले दाणे, दोन किसलेले टमाटे, चिली फ्लेक्स, आमचूर पावडर, मीठ, तिखट, थोडा गरम मसाला हे सर्व एकत्र घालून एक उकळी आणावी. नंतर गॅस बंद करून त्यात गार झालेल्या इडल्या घालाव्या व जरा परतून घ्यावा व त्या प्लेटमध्ये घालून त्यावर चीझ व कोथिंबीर घालावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

मसाला इडली
साहित्य :- उडीद डाळ दीड कप, तांदूळ तीन कप, आंबट दही एक कप, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, आले, कोथिंबीर, मीठ.
कृती :- उडीद डाळ, तांदूळ भिजत घालून एकजीव करावे. त्यात दही, मीठ घालावे. चांगले ढवळून जरुरीइतके पाणी घालावे. हे मिश्रण सात-आठ तास झाकून ठेवावे. मग खाण्याच्या वेळी त्यात चिरलेली कोथिंबीर घालून नेहमीप्रमाणे इडलीपात्रात इडल्या कराव्यात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

व्हेजिटेबल इडली
साहित्य :- तांदळाचा रवा तीन वाट्या, उडीदडाळ एक वाटी, मेथी एक चमचा, मीठ, फरसबी अर्धी वाटी चिरून, गाजर जाड किसून अर्धी वाटी, मटार पाव वाटी, बटाट्याचे तुकडे अर्धी वाटी, जिरे, साखर, तेल, आल्याचा कीस, हिरव्या मिरचीचे तुकडे.
कृती :- तांदूळ, रवा एक तास व उडीद डाळ, मेथी तीन तास भिजवून ठेवावी. हे सर्व बारीक वाटून घ्यावे. भाज्या मोजक्या् पाण्यात शिजवून घ्याव्यात. आंबवलेल्या पिठात गार झालेल्या भाज्या, किसलेले गाजर, मीठ, मिरचीचे तुकडे, जिरे, साखर व थोडे तेल घालून चांगले फेटावे. नेहमीप्रमाणे इडल्या कराव्या व चटणीसह खाण्यास द्याव्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

मक्याची इडली
साहीत्य:- १ कप मक्याचे पीठ, १ कप दही या दोघांचे मिश्रण करुन फेटून घ्या. २ टेबल स्पून तेल २-३ टेबल स्पून कोथिंबिर, १०-१२ कढीपत्याचे पाने, १ लहान चमचा चणा दाळ, १ लहान चमचा उडद दाळ, १-२ बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या, ३-४ लहान चमचे फ्रूट साल्ट, थोडी मोहरी आणि चवी नुसार मीठ , १ इंच आले.
कृती :- एका तव्यावर २ चमचे तेल टाकुन गरम करा आणि मोहरीची फोडणी द्या. चनादाळ आणि उडद दाळ रंग येई पर्यंत भाजुन घ्या.आले, मिरची आणि कढीपत्ता थोडा भाजुन घ्या. मक्याचे पीठ थोडा वेळ भाजा. भाजलेले मिश्रण एका दुस-या भांड्यात काढुन घ्या. यामध्ये मीठ, दही आणि कोथिंबिर मिळवा आणि पाणी टाकुन तांदळ्याच्या इडली प्रमाणे पातळ मिश्रण बनवा. हे मिश्रण चांगल्या प्रकारे घोळुन १० मिनिटे ठेवुन द्या, १० मिनिटामध्ये हे मिश्रण सेट होऊन जाईल. या मिश्रणामध्ये ईनो फ्रूट साल्ट टाका पंधरा मिनिटांनंतर इडली पात्रात इडली घालण्यास सुरवात करा. १५ मिनिटात इडली तयार.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

इडली सँडविच
साहित्य :- उकडलेल्या इडल्या, एक काकडी, एक टोमॅटो, एक उकडलेला बटाटा, हिरवी चटणी, टोमॅटो केचप, तळायला रिफाइंर्ड तेल, टूथ पिक्स.
कृती : इडली मध्ये कापून भरपूर तेलात तळून घ्याव्यात. इडलीच्या एका भागावर चटणी लावावी. दुसऱ्या भागावर टोमॅटो क्रॅचअप लावा. काकडीचं साल काढून पातळ गोल काप करावे. टोमॅटोचे पातळ गोल काप कापावे. बटाट्याचे साल काढून पातळ गोल काप कापावे. सर्व कापांना थोडंसं मीठ व मिरपूड लावून ठेवा. इडलीच्या एका भागवर एक काकडीचा तुकडा, एक टोमॅटोचा तुकडा, एक बटाट्याचा तुकडा ठेवून वरती इडलीचा दुसरा भाग ठेवून जरासा दाब देऊन वरतून टूथ पीक आरपार टोचावी. इडली जराश्या तुपात तव्यावर थोडा वेळ परतली तर ती पण इडली चटणीबरोबर चांगली लागते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

टॉमाटो इडली
साहित्य:- इडलीचे पीठ बनवण्यासाठी:- २ कप साधे तांदूळ, १ कप उडीदडाळ,
टॉमाटो इडलीसाठी:- १ मोठ्या आकाराचा कांदा, १ मोठ्या आकाराचा टोमाटो, १ मध्यम आकाराचा बटाटा (सोलून), १ टे स्पून आले-हिरवी मिरची पेस्ट, १/४ कप कोथंबीर (चिरून), साखर व मीठ चवीने, एक चिमुट सोडा (खायचा), तेल.
कृती:- इडलीचे तयार करण्यासाठी तांदूळ व डाळ वेगवेगळी धुऊन ७-८ तास भिजत ठेवा. मग मिक्सरमध्ये थोडेसे जाडसर वाटुन घेऊन हातानी एकसारखे करून परत ७-८ तास झाकून ठेवा म्हणजे इडलीचे मिश्रण चांगले फसफसून येईल. कांदा, टोमाटो, बटाटा बारीक चिरून घ्या. आले-हिरवी मिरची-कोथंबीर वाटुन घ्या. जिरे थोडे गरम करून पूड करून घ्या. इडलीच्या पिठात चिरलेला कांदा, टोमाटो, बटाटा, आले-हिरवी मिरची पेस्ट, जिरे पावडर, साखर-मीठ घालून मिक्स करून घ्या, मग त्यामध्ये एक चिमुट सोडा घालून मिक्स करा. कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवा, इडलीच्या साचाला तेल लाऊन त्यामध्ये मिश्रण घाला. इडली कुकर १५ मिनिटे इडली वाफवून घ्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

ज्वारीची इडली
साहित्य:- १ कप तांदूळ, १ कप उडीदडाळ, १ कप ज्वारी, १ कप रवा, एक चिमुट सोडा, मीठ चवीने, तेल.
कृती: प्रथम तांदूळ, उडीदडाळ, ज्वारी, धुऊन ७-८ तास वेगवेगळे पाण्यात भिजत ठेवा. मग मिक्सरमध्ये जाडसर वाटुन घ्या. वाटुन झाल्यावर त्यामध्ये रवा मिक्स करून मिश्रण परत ७-८ तास झाकून ठेवा. (सकाळी नाश्त्याला इडली बनवायची असेल तर आधले दिवशी सकाळी धान्य भिजत घालून संद्याकाळी वाटावे मग त्यामध्ये रवा घालून मिक्स करून दुसऱ्या दिवशी सकाळी इडली बनवावी.) दुसऱ्या दिवशी सकाळी त्यामध्ये मीठ व सोडा घालून मिक्स करून एक तास मिश्रण परत बाजूला ठेवा. एक तासाने कुकर मध्ये पाणी गरम करायला ठेवावे व इडली पात्राला तेलाचा हात लावुन मिश्रण घालावे. इडली कुकर १५ मिनिटे इडली वाफवून घ्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

मिनी इडली कबाब
साहित्य: जे घरी इडलीचे पीठ तयार असेल ते, सिमला मिरची, टोमॅटो, गाजर, चीझ, लिंबू, तेल, टोमॅटो सॉस, टूथपीक, मिरपूड, मीठ.
कृती:- आधी नेहमी प्रमाणे इडल्या करून घ्या. मिनी इडल्या केल्या तर उत्तम,नसल्यास तुकडे करून घ्या. आता भाज्यांचे तुकडे व मिनी इडल्या एका बाऊल मध्ये घ्या. त्यावर लिंबाचा रस, मिरपूड, मीठ घालून थोडा वेळ मुरत ठेवा. टूथपीक घेवून त्याला एक इडली, मग एक सिमला मिरचीचा तुकडा, टोमॅटोचा तुकडा, पुन्हा एक इडली, गाजराचा तुकडा, चीझ्‌चा तुकडा व पुन्हा एक इडली, वगैरे या क्रमाने टोचत जा. आता फ्रायपॅन मध्ये अगदी थोडेसे तेल टाका.त्यावर तयार केलेले 3-4 टूथपीक ठेवून थोडे हलके तळून घ्या. सॉस त्यावर टोमॅटो टाका. परत जरा फ्राय करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*