घाटले

एक डाव भरून तांदळाचे पीठ किंवा गव्हाचे पीठ घ्यावे. १ वाटी बारीक चिरलेला गूळ, १ वाटी नारळाचा चव, गव्हाचे पीठ तुपावर भाजून घ्यावे. चिमूटभर जायफळाची पावडर, १ वाटी पाण्यात  पीठ मिसळून ठेवावे. १ वाटी पाण्यात नारळाचा चव व गूळ एकजीव होईपर्यंत मिसळावा. नंतर त्यात ३ वाटय़ा पाणी घालून पातेले मंद गॅसवर ठेवावे. उकळी आली की वाटीभर पाण्यात मिसळून ठेवलेले पीठ ओतावे. ते मिश्रण व्यवस्थित ढवळावे. उकळ्या येई तो घाटले ढवळत रहावे. त्यात जायफळ पूड मिसळावी. घाटले थंड झाल्यावर फार दाट वाटल्यास थोडे उकळते पाणी मिसळून थोडा वेळ उकळावे. गरम गरम वाढावे. हे घाटले तांदळाच्या घावनाबरोबर द्यावे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*