गाजराची कोशिंबीर

साहित्य : गाजर, लिंबू, दाण्याचे कुट, तेल, मोहरी, हिंग, हळद, साखर आणि मीठ.

कृती : सर्वप्रथम गाजरं किसून घेणे. त्यानंतर त्यामध्ये साखर आणि मीठ घालून लिंबाचा रस घालणे. व त्यावर दाण्याचे कुट घालून हे सर्व मिश्रण एकत्र करुन अर्धा तास ठेवणे. त्यानंतर तेल तापवून ते तापल्यावर मोहरी घालणे. मोहरी तडतडल्यावर हिंग घालून गॅस बंद करणे. व ही फोडणी गाजरावर ओतून हवा असल्यास नारळाचा चव व थोडी कोथिंबीर घालून ढवळून घेणे.

— सौ. सुनिता दामले

Avatar
About खाद्यपदार्थ WhatsApp ग्रुप 71 Articles
श्री. संजीव वेलणकरांच्या ”मराठी खाद्यपदार्थ” या WhatsApp ग्रुपवरील पाककृती...

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*