साहित्य :- भरताची मध्यम आकाराची २ वांगी, प्रत्येकी २ टे.स्पू. बारीक चिरलेल्या भाज्या- गाजर, बीट, बटाटा, फ्रेंच बिन्स, फ्लॉवर, स्वीट कॉर्न, पनीर यांपैकी कोणत्याही (जास्तीत जास्त भाज्या असाव्यात, पण एखादी भाजी नसेल तरी चालू शकेल.) कोथिंबीर, मीठ- मिरपूड, १ टे.स्पू. ठेचलेली लसूण, २-3 टे.स्पू. ब्रेडक्रम्स, २ चीज क्यूब्ज, २ टे.स्पू. तेल, प्रत्येकी १ टे.स्पू. लाल तिखट, जिरे पावडर, धने पावडर, १ टे.स्पू. भाजलेले तेल.
कृती :- वांग्याचे साधारण पाव इंच जाडीचे स्लाईस करून घ्या. तिखट, मीठ, धने आणि जिरे पावडर एकत्र करून वांग्याच्या कापांना चोळून लावा. झाकून ठेवा. सगळ्या भाज्या मऊ वाफवून थोड्या ठेचून घ्या. त्यात मीठ, मिरपूड, अर्ध किसलेलं चीज, तीळ, लसूण आणि कोथिंबीर घाला. चांगलं मिक्स करा. ओव्हनच्या ट्रेला तेलाचा हलका हात फिरवून घ्या. त्यावर वांग्यांच्या स्लाइस ऍरेंज करा. प्रत्येक स्लाइसवर भाज्यांचं मिश्रण पसरवा. वरून चीज आणि ब्रेडक्रम्स मिक्सग करून पसरवा. यातसुद्धा तीळ छान लागतात. बाजूनी थोडं थोडं तेल सोडा. १८० अंश वर १५-२0 मिनिटापर्यंत बेक करा. ओव्हन नसेल तर स्लाईसला तेल लावून एका बाजूने तेलावर भाजून घ्या. खमंग बाजू वर करून त्यावर भाज्या पसरवा आणि तेल सोडून बारीक गॅसवर खमंग होऊ द्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply