आजचा विषय चटणी भाग दोन

आजकाल घरोघरी मिक्सर असले आणि सगळ्या वाटण्याघाटण्यासाठी त्यांचाच वापर होत असला तरी एकेकाळी चटण्या खलबत्त्यात कुटूनच केल्या जायच्या. खलबत्त्यात कुटून केली जाणारी शेंगदाण्याची चटणी आणि मिक्सरमध्ये भरडून केली जाणारी शेंगदाण्याची चटणी यांच्या चवीत जमीन अस्मानाचा फरक पडतो. खलबत्त्यात कुटली जाताना ती एकसारखी कुटली जात नाही. त्यामुळे शेंगदाण्याचे लहानमोठे तुकडे होतात. तर मिक्सरमध्ये ती सगळी एकसारखीच वाटली किंवा भरडली जाते. हीच गोष्ट सुक्या खोबऱ्याच्या चटणीची, तिळाच्या चटणीची आणि कारळाच्या चटणीचीसुद्धा. कुटले जात असताना या चारही घटकांना आपोआपच तेल सुटतं. ते हा चवीतला फरक आणत असावं. मिक्सरमध्ये शेंगदाण्याचे, तिळाचे, कारळाचे दाणे एकसारखेच गुळगुळीत होऊन जात असल्यामुळे हवी ती खमंग चव येत नसावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

खानदेशी शेंगदाणा चटणी
साहित्य:- एक कप शेंगदाणे (भाजलेले), १० लसूण पाकळ्या, 3-4 हिरव्या मिरच्या, १ टेबल स्पून कोथिंबीर, मीठ चवीनुसार,
फोडणीसाठी:-१ टेबल स्पून तेल
कृती : शेंगदाणे भाजून त्याची टरफले काढून घ्यावीत. लसूण व कोथिंबीर चिरून घ्यावी.
कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिरव्या मिरच्या अगदी एक मिनिट परतून घेऊन काढून ठेवाव्यात. मिक्सारच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे, लसूण, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, मीठ घालून अर्धा मिनिट ग्राइंड करून घ्यावे. मग त्यामध्ये अर्धा कप पाणी घालून परत अर्धा मिनिट ग्राइंड करून घ्यावे. ग्राइंड केलेली चटणी एका बाउलमध्ये काढून घ्यावी व त्यामध्ये मिरची परतून घेतलेले तेल मिक्स करून घ्यावे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

सोलापुरी शेंगदाण्याची चटणी
साहित्य:- भाजलेले शेंगदाणे १ किलो ( न सोललेले ), १० लसूण पाकळ्या, ५ चमचे तिखट, १ चमचा मीठ, अर्धी वाटीशेंगदाण्याचे तेल
कृती:- भाजलेले शेंगदाणे (सालासकट), लसूण, तिखट, मीठ आणि पाव वाटी शेंगदाणा तेल कढईत घ्यावे.मंद गॅसवर थोडा वेळ परतावे. चांगले खरपूस झाले की गॅस बंद करावा.गरम असतानाच हे सर्व मिक्सरमध्ये दोन चारदा फिरवावे. अधमुरे वाटलेले थोडे काढून बाजूला ठेवावे. थोडी लसूण मिक्सर मध्ये टाका आता मिक्सरवर हे बारीक वाटावे.आता मघाशी काढून ठेवलेले अधमुरे वाटलेले पुन्हा मिक्सरमध्ये घालावे. त्यात पाव वाटी शेंगदाणा तेल टाकावे. अन मिक्सर पुन्हा एकदा फिरवावा.
तयार आहे खमंग, झणझणीत शेंगदाण्याची चटणी. अर्धातास तशीच ठेवली की असे तेल सुटते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

जवसाची चटणी
साहित्य:- जवस १/२ वाटी, १० पाने, कढीपत्ता, कोथिंबीर ५० ग्रॅम, ३ टीस्पून तीळ, ५,६ लसूण पाकळया. १ टीस्पून लाल तिखट, १ टीस्पून जिरे, मीठ व साखर चवीनुसार, १ चमचा तेल.
कृती:- पॅनमध्ये थोडया तेलात जवस परतून घ्या. थोडा खमंग सुवास आला की त्यात तीळ घालून परता. थोडे गार झाले की त्यात मीठ, साखर, लाल तिखट, जिरे, लसूण, कोथिंबीर व कढीपत्ता घालून मिक्सरमधून फिरवून घ्या. जवसाची चटणी तयार.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

शेंगदाणे +तीळ+लसूण चटणी
साहित्य:- १ वाटी शेंगदाणे, १/२ वाटी तीळ, १०ते १२ सुक्या लाल मिरच्या, १ मध्यम गड्डी लसूण, मीठ चवीनुसार
कृती:- शेंगदाणे व तीळ वेगवेगळे खमंग भाजा. गॅस न लावताच लाल मिरच्या दाणे तीळ भाजलेल्या गरम कढईत घालून थोड्या परता. मिक्सर मध्ये तीळ आधी फिरवून घ्या त्यावर दाणे, मग मिरच्या आणि शेवटी लसूण घाला. मिरच्या मिक्सर मधून फिरवून घ्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

लसूण चटणी
साहित्य:- १ सुक्या खोबर्यारची वाटी ८-१० सोललेल्या लसूण पाकळया, अर्धा चमचा जिरे, दीड चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ.
कृती:- खोबरे किसून व तव्यावर थोडेसे कोरडेचे भाजून घ्यावे. नंतर तव्यात जिरेही थोडेसे कोरडे भाजून घ्यावेत. किसलेले खोबरे, जिरे, तिखट, मीठ व लसूण पाकळया एकत्र कराव्यात व खलबत्यात ही चटणी कुटावी. काही जणांना त्यात भाजलेले दाणे घातलेलेही आवडतात. तेही चांगले लागतात,
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

तिळाची चटणी
साहित्य:- दोन वाटया निवडून घेतलेले पांढरे तीळ, २ चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ.
कृती:- कढईमध्ये तीळ घालून गुलाबी होईपर्यंत कोरडे भाजावेत, त्यात तिखट-मीठ घालून हे मिश्रण खलबत्यात कुटावे. त्याला तेल सुटून चटणीचा गोळा होतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

पुदिन्याची चटणी
साहित्य:- १ पुदिन्याची गड्डी, १ हिरवी मिरची, चवीनुसार थोडे लाल तिखट, १ चमचा मीठ, १ चमचा जिरे, ३ मुठी धुवून चिरलेली कोथिंबीर, २ लसूण पाकळया, अर्धे लिंबू.
कृती:- प्रथम पुदिना निवडून स्वच्छ धुवून ठेवावा, नंतर त्यात एक मिरची, लाल तिखट, १ चमचा जिरे, २ लसूण पाकळया व कोथिंबीर घालावी. हे सर्व नंतर पाटयावर बारीक वाटावे की चटणी तयार झाली. ही चटणी परोठा, पुर्याा किंवा ब्रेडबरोबर पण चांगली लागते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

गाजराची तिखट चटणी
साहित्य:- चार दिल्ली गाजरे (मोठी), तीन हिरव्या मिरच्या (चिरून), पाव कप नारळ, एक टेबल स्पून कोथिंबीर (चिरून), एक टी स्पून चिंच, पाव टी स्पून हिंग, मीठ चवीनुसार.
कृती:- गाजर धुऊन, किसून घ्यावे. हिरवी मिरची चिरून घ्यावी. नारळ खवून घ्यावा. कोथिंबीर चिरून घ्यावी. किसलेले गाजर, हिरवी मिरची, नारळ, चिंच-गूळ, मीठ, हिंग घालून चटणी वाटून घ्यावी. वाटलेली चटणी बाउलमध्ये काढून घ्यावी. मग त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करावे. चपातीबरोबर चटणी सर्व्ह करावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*