ब्रेड पिझ्झा

साहित्य: ४ ब्रेडचे स्लाईस, १/२ कप पिझ्झा सॉस, १/२ कप भोपळी मिरचीचे पातळ काप, १/२ कप कांद्याचे पातळ काप, टोमॅटोच्या १२ पातळ चकत्या, १/२ कप किसलेले पनीर, अर्धा ते पाऊण कप किसलेले चिझ, ड्राय बेसिल किंवा ओरेगानोची पाने, २ ते ३ चिमटी मिठ, सुक्या लाल मिरच्यांचा चुरा आवडीनुसार.

कृती: ओव्हन ४०० F वर प्रिहीट करण्यास लावावे. चिरलेल्या सर्व भाज्यांवर थोडे मिठ पेरावे. प्रत्येक ब्रेड स्लाईसवर पिझ्झा सॉस लावावा. त्यावर टोमॅटो, कांदा आणि भोपळी मिरची घालावी. वरून किसलेले पनीर पेरावे. ड्राय बेसिल पाने चुरडून भुरभुरावीत. आवडीनुसार चिज घालावे. आणि साधारण १० मिनीटे बेक करावे किंवा चिज वितळून किंचीत सोनेरी झाले कि लगेच पिझ्झा बाहेर काढावा.

गरमागरम सर्व्ह करावा. सर्व्ह करताना वरून चिमूटभर ड्राय रेड चिली फ्लेक्स आणि ड्राय बेसिल पाने क्रश करून भुरभुरावीत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*