आजचा विषय केळी भाग तीन

फळं जास्त वेळ चांगल्या अवस्थेत राहण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवली जातात. त्या अवस्थेत ती ताजी राहतात. मात्र केळी फ्रिजमध्ये ठेवत नाहीत. चुकून जरी ठेवलं गेलं तरी ते ताबडतोब वरून काळं पडतं. उष्ण प्रदेशातील फळं विशेषत: केळयांवर थंडीचा परिणाम जास्त होतो. केळं हे फळ जास्त काळ म्हणजे १३.३ डिग्री सेल्सिअस तापमानाला ताजं राहतं. साधारण तापमान १० डिग्री सेल्सिअस खाली गेलं की, केळय़ातील विकरं (एन्झाइम) स्रवू लागतात. त्यामुळे केळयांच्या साली काळया दिसू लागतात. तापमान खाली गेलं की, केळयाचा पापुद्रा सच्छिद्र होऊन त्यातून विकरं पाझरू लागतात. वनस्पतीच्या रचनेतील महत्त्वाचं बहुवारिक (पॉलिमर्स) म्हणजे सेल्युलेज आणि पेक्टीन एस्टरेज. त्यांचं अनुक्रमे सेल्युलोज आणि पेक्टीनमध्ये विघटन होतं. केळयातील पिष्टमय पदार्थाचं (स्टार्च) अमिलेजसारख्या विकरामध्ये विघटन होतं. त्यामुळे केळयाचा मूळ आकार बिघडून ते लिबलिबित होतं. त्याशिवाय पॉलिफिनील ऑक्सिडेज हे आणखी एक विकर मुक्त होतं. ऑक्सिजनच्या संयोगाने ते केळय़ातील फिनॉलचं रूपांतर पॉलिफिनिलमध्ये केलं जातं. माणसाची त्वचा उन्हामुळे काळवंडते ती त्यातील मेलॅनिनमुळे (एक प्रकारचं रंगद्रव्य). तशीच पॉलिफिनिलची संरचनाही काहीशी मेलॅनिनसारखी असते. केळयामध्ये आंबटपणा खूपच कमी आहे. त्यामुळेही केळी लवकर काळवंडतात. या केळयांवर मेणाचं आवरण चढवल्यास त्यांचा ऑक्सिजनशी संपर्क तुटतो. त्यामुळे साल काळवंडण्याची क्रिया उशिराने होते. पण मेण चोपडून केळं फ्रिजमध्ये ठेवण्यापेक्षा बाहेरच ठेवलेलं बरं!
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

इन्स्टंट बनाना चिप्स
साहित्य:- २ कच्ची केळी, मीठ चवीनुसार, अर्धा चमचा हळद, तेल.
कृती:- केळी सोलून त्याचे काप करा. त्याला हळद व मीठ चोळून एक ते दोन मिनिटे तसेच राहू द्या. मग कढईत तेल गरम करून ते काप तळून घ्या. सोनेरी रंगावर तळून काढा. कुरकुरीत होतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

बनाना क्रिस्पी
साहित्य:- १ भांडे कणीक, अर्धा पेला पिठीसाखर, १ पिकलेले केळे, दीड चमचा तूप, पाव भांडे दूध, १ लहान चमचा वेलची पूड, 1 लहान चमचा तीळ.
कृती:- केळे कुस्करून घ्या. एका भांड्यात कणीक, साखर, केळ, तूप, दूध, तीळ व वेलची पूड मिसळून घ्या. व्यवस्थित पीठ मळून घ्या. लहान लहान पुऱ्या लाटून सुरीने टोचून तेलात फ्राय करा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

केळ्याचे सामोसे
साहित्य:- २ कच्ची केळी, १ लहान चमचा जिरे, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा आमचूर पावडर,२ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, मीठ, तेल. आवरणाचे साहित्य :- दीड भांडे मैदा, २ चमचे तेल, थोडे मीठ.
कृती:- एका पॅनमध्ये तेल गरम करून जिरे टाकून परता. मग हिरवी मिरची, हळद, आमचूर पावडर, मीठ व उकडलेली केळी टाकून पुन्हा परता. मैद्यात मीठ व तेल मिसळून मळून घ्या. त्याची पुरी लाटा व मधोमध दोन भाग करा. एका भागाला कोनाचा आकार देऊन त्यात सारण भरा. पाणी लावून कडा बंद करा. अशा प्रकारे सर्व सामोसे बनवून सोनेरी रंग येईपर्यंत तळा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

केळ्याचे गुलाबजाम
साहित्य:- १ भांडे रवा, अर्धा भांडे दूध, २ लहान चमचे पनीर, १ पिकलेले केळे, १ पेला साखर, थोडे केशर, तेल.
कृती :- एक चमचा दुधात केशर भिजवा. रवा परतून घ्या. एका डिशमध्ये पनीर, रवा, दूध व केळे घालून मळून घ्या. लिंबाच्या आकाराचे गोळे बनवा. कढईत तेल गरम करून सोनेरी रंगावर तळून घ्या. एका भांड्यात १ भांडे साखर व १ भांडे पाणी उकळून पाक तयार करा. पाकात केशर घाला. केळ्याचे गुलाबजाम पाकात घालून लगेच खाण्यास द्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

केळ्याचे भानोले
साहित्य: २ पिकलेले केळी, नारळाचे दूध १ वाटी, जाडसर तांदळाचे पीठ अर्धी वाटी, वेलची पावडर १ चमचा, मीठ चिमूटभर, साखर १ चमचा, जाड रवा २ चमचे.
कृती : सगळे जिन्नस एकत्र करून मिक्सरमध्ये एकजीव करा व बीडाच्या तव्यावर जाडसर भोनोले तयार करून रबडीबरोबर सव्‍‌र्ह करा.
टीप : भानोले म्हणजेच, थोडक्यात उत्तपमप्रमाणे तयार करावेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

केळ्याच्या चकल्या
साहित्य:- १२ कच्ची केळी, साबुदाणा १ वाटी, जिरे १ चमचा, मीठ अर्धा चमचा, अर्धा लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर पाव वाटी.
कृती:- कच्ची केळी शिजवून गार झाल्यावर साले काढून घ्या. नंतर मिक्सर अथवा पुरणयंत्रातून बारीक करून घ्या. त्यात एक वाटी साबुदाणा भिजवून ठेवा. त्यात जिरं, मीठ, चिरलेली कोथिंबीर घालून चांगले एकत्र करा आणि प्लास्टिकच्या कागदावर चकल्या पाडा आणि उन्हात वाळवा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

रेशमी बनाना
साहित्य : मोठय़ा आकाराची केळी ४ नग, साखर १ वाटी (तव्यावर ब्राऊन होईस्तोवर परतून घ्यावी), काजू, किसमिस ४ चमचे, कॉर्नस्टार्च ५ चमचे, तेल (रिफाइंड व्हे. ऑइल) तळायला, आइस्क्रीम स्लाइस २.
कृती:- केळी सोलून त्याचे २ भाग करावेत व मधून पोखरून त्यामध्ये ब्राऊन शुगरबरोबर काजू, किसमिससुद्धा घालावे. अशी तयार झालेली केळी कॉर्नस्टार्चच्या द्रावणात बुडवून तळून घ्यावी. गरम तव्यावर साखर घालून कॅरामलसारखं करावे. त्यात केळी बुडवावी. एका प्लेटमध्ये फ्रेश क्रीम किंवा आइस्क्रीम ठेवून त्यावर केळी ठेवून खायला द्यावी.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

बनाना रायता
साहित्य:- केळी ५ नग, घट्ट दही २ वाटय़ा, लिंबू अर्धा नग, मीठ अर्धा चमचा, साखर अर्धा चमचा, बारीक चिरलेली हिरवी मिरची २ चमचे, बारीक चिरलेली कोथिंबीर पाव वाटी
कृती:- केळ्यांचे काप करून त्याला लिंबू चोळून ठेवणे. त्यानंतर दही घट्ट घोटून घेणे. त्यात केळ्यांचे काप, दही, मीठ, साखर, मिरच्यांचे तुकडे, कोथिंबीर घालून सव्‍‌र्ह करणे.
टीप:- केळाला लिंबू चोळल्याने केळे काळे पडत नाही. वाटल्यास यात भिजलेले जिरेसुद्धा घालू शकतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

Avatar
About संजीव वेलणकर 617 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

1 Comment on आजचा विषय केळी भाग तीन

  1. पंडित जवाहरलाल नेहरू नी सांगितले आहे की उच्चारावरून विद्वत्ता , आवाजावरून नम्रता आणि वर्तनगरून शील समजते.. त्याच प्रमाणे माझं असं मत आहे की पाककृती आणि त्यातील समज यावरून संस्कार आणि विचारसरणी कळते.. उत्कृष्ट.. धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.


*