‘वॉटर मॅन ऑफ इंडिया’ डॉ. राजेंद्रसिंह

‘वॉटर मॅन ऑफ इंडिया’ म्हणून प्रेमादराने गौरवले जाणारे भारतातल्या जलसंवर्धन चळवळीतले अग्रणी डॉ. राजेंद्रसिंह यांचा जन्म ६ ऑगस्ट १९५९ रोजी बागपतमध्ये (उत्तर प्रदेश) येथे झाला.

डॉ. राजेंद्रसिंह हे ‘वॉटर मॅन ऑफ इंडिया’ म्हणून प्रेमादराने गौरवले जाणारे भारतातल्या जलसंवर्धन चळवळीतले अग्रणी आहेत. राजस्थानात थर वाळवंटानजीकच्या गावांमध्ये पाणी साठवण्यासाठीच्या ‘जोहड’ या पारंपरिक रचनांसोबतच छोटे बंधारे वगैरेंच्या माध्यमातून जलसंवर्धनासाठी त्यांनी लोकांना मार्गदर्शन आणि साह्य केलं. या संदर्भातल्या कामाची सुरुवात १९८५ मध्ये एका गावापासून झाली.

आजवर ८६०० हून अधिक जोहड उभारली गेली आहेत. राजस्थानातल्या पाच नद्यांचं पुनरुज्जीवनही शक्य झालं आहे. राजस्थानातल्या अल्वर जिल्ह्यात त्यांचं काम मोठं आहे.

या क्षेत्रातल्या त्यांच्या अतुलनीय कार्याची दाखल घेऊन २०१५ साली डॉ.राजेंद्रसिंह यांना ‘नोबेल’च्या दर्जाचं मानलं जाणारं दीड लाख डॉलर्सचं ‘स्टॉकहोम वॉटर प्राइझ’ मिळालं आहे.

अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

डॉ.राजेंद्रसिंह यांची वेबसाईट. http://tarunbharatsangh.in/
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*