देशमुख, विलासराव

कर्तृत्व आणि परिश्रमावर विश्वास असणारा नेता. या विश्वासामुळेच बाभूळगावच्या सरपंच पदापासून सुरु झालेला प्रवास आज केंद्रिय अवजड उद्योग मंत्रालयापर्यंत येऊन ठेपला आहे.

दोन वेळा त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविले. वसंतराव नाईक यांच्यानंतर सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदावर राहणारे विलासराव हे दुसरे मुख्यमंत्री होत.
आपल्या कारकिर्दीत विलासरावांनी राज्याच्या विकासाला गती देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. राज्याच्या स्वच्छतेच्या क्षेत्रात क्रांती घडवून आणणार्‍या संत गाडगे महाराज स्वच्छता अभियनाला गती देण्याचे काम त्यांनी केले. महाराष्ट्र सहकार वित्त व विकास मंडळ, अल्पसंख्याक विकास महामंडळाची स्थापना त्यांच्याच काळात झाली. राज्यात गुटखा बंदी, डान्सबार बंदीसारखा महत्त्वाकांक्षी निर्णय त्यांनी घेतला. विद्युत मंडळाचे विभाजन करुन महावितरण, महानिर्मिती व महापारेषण या तीन कंपन्या त्यांनी स्थापन केल्या. सेझ अर्थात विशेष आर्थिक क्षेत्र स्थापनेला त्यांनी चालना दिली. जिल्हा परिषदांकडे अधिकार वर्ग करण्याचा दूरगामी निर्णय त्यांनी घेतला. अर्बन लॅण्ड सिलिंग अॅक्ट रद्द करण्याचा

निर्णयही त्यांच्याच काळात झाला.

व्यापक जनसंपर्क, प्रभावी वक्तृत्व आणि भविष्याचा अचूक वेध घेण्याची दृष्टी ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ठळक वैशिष्ट्ये आहेत.
## Vilasrao Deshmukh

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*