उषा मंगेशकर

ज्येष्ठ गायिका

ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर यांचा जन्म १५ डिसेंबर १९३५ रोजी झाला. ‘छबीदार छबी मी तोऱ्यात उभी’, ‘एक लाजरा न्‌ साजरा’, ‘काय बाई सांगू’, ‘गोड गोजिरी लाज लाजरी’, ‘खेळ कुणाला दैवाचा कळला’, ‘शालू हिरवा’, ‘मुंगळा’, ‘मै तो आरती उतारू रे’ यासारखी असंख्य गीते आपल्या मधुर आवाजाने अजरामर करणाऱ्या उषाताई मंगेशकर यांचा संगीत प्रवास अलौकिक असाच आहे.

मराठी, हिंदीसह गुजराती व नेपाळी भाषेतही गायन केलेल्या उषाताईंनी भक्तीगीत, भावगीत, लोकसंगीतापासून ते चित्रपट संगीतापर्यंतच्या सर्व प्रकारांत आपली सुरेल मोहोर उमटवली.

उषाताई मंगेशकर यांना खरी प्रसिद्धी मिळाली ते जय संतोषी माँ या चित्रपटातील काही गाण्यांनंतर मे तो आरती उतारु रे या गाण्यांसाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट स्त्री गायिका पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले. नंतर त्यांचे मुंगळा हे गाणे व पिंजरा या चित्रपटातील गाणी तर लोकांच्या मनात अजून ही घर करून आहेत.

उषा मंगेशकर यांना मेहंदी ॲ‍वॉर्ड, वेस्ट बंगाल क्रिटिक ॲ‍वॉर्ड, सूरसिंगार ॲ‍वॉर्ड, रोटरी ॲ‍वॉर्ड, असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

अधिक विस्तृत माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*