महाबळे, त्र्यंबक शंकर

 

(जन्म १९०९ मृत्यू १९८३)
भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ. मुंबईच्या विज्ञान संस्थेतून पुणे विद्यापीठात प्राध्यापक म्हणून गेले आणि १९७१ पर्यंत तेथे संशोधन केले, विभागाला आंतरराष्ट्रीय दर्जा आणून दिला. कठीण शास्त्रीय विषय सोप्या शब्दांत समजावून देणे, नियमितपणा, शिस्तबद्ध कार्यक्रम, संशोधनात आधुनिक तंत्र व साधने यांचा उपयोग करणे, याबद्दल महाबळे यांची ख्याती होती. इंडियन सायन्स काँग्रेसच्या
१९६९च्या चंदिगडच्या अधिवेशनात त्यांनी सादर केलेले दख्खनच्या वनस्पतींवरचे व्याख्यान अजूनही मोलाचे समजले जाते. भारतांतील वैज्ञानिक संस्थांचे सदस्यत्व आणि अध्यक्षपदे त्यांनी भूषवली आहेत. १९७१ साली मुंबई येथे भरलेल्या मराठी विज्ञान संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

माहितीस्त्रोत – (म.वि.प.चा.) विज्ञानतंत्रज्ञान कोष

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*