गझलकार सुरेश भट

कवी, पत्रकार, संपादक आणि मराठी गझल साहित्याचे मानदंड समजले जाणारे गझलकार सुरेश श्रीधर भट. १५ एप्रिल १९३२ रोजी अमरावती येथे सुरेश भटांचा जन्म झाला. शिक्षण अमरावती येथे झाले. बी. ए. ची पदवी त्यांनी विदर्भ महाविद्यालय येथून प्राप्त केली. त्यानंतर अनेक वृत्तपत्रातून ते लिखाण करू लागले. तरुणभारत, लोकसत्ता इ. वृत्तपत्रातून वार्ताहर म्हणून त्यांनी काम पाहिलं. ‘बहुमत’ या साप्ताहिकाचे ते काही वर्ष संपादकही होते. […]

राम गणेश गडकरी

मराठी साहित्यात नाटककार, विनोदी लेखक व कवी अशा तिन्ही आघाडयांवर आपल्या प्रतिभेची छाप पाडणारे साहित्यिक म्हणून राम गणेश गडकरी अजरामर ठरले. आपल्या अल्पशा कारकीर्दीत त्यांनी गाजवलेलं कर्तृत्व मराठी रसिकांच्या मनात कायमचं कोरलं गेलं. विशेषत त्यांच्या एकच प्याला` या नाटकाचे प्रयोग त्यांच्या मृत्यूनंतरही होत आहेत. […]

वाड, निशिगंधा

निशिगंधा वाड ही मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील एक अभिनेत्री आहे. लहानपणी दुर्गा झाली गौरी या मराठी नाटकातील तिचे काम लोकांच्या विशेष लक्षात राहिले. निशिगंधाने १०० हून जास्त मराठी व हिंदी चित्रपटांतून काम केले आहे. […]

प्रा. नागनाथ कोत्तापल्ले

कथालेखक, कादंबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले नागनाथ लालुजीराव कोत्तापल्ले. नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म २९ मार्च १९४८ रोजी नांदेड जिल्ह्यातील मुखेड या गावी झाला. १९६९ साली देगलूर येथील महाविद्यालयातून त्यांनी बी. ए. ची पदवी मिळविली. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठातून एम. ए. आणि १९८१ साली पीएच. डी. ची पदवी ही त्यांनी मिळविली. […]

श्रीकांत वामन नेर्लेकर

ठाणे येथील ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक. ठाणे रेल्वे पॅसेंजर्स असोसिएशनचे सदस्य, ६१ व्या मराठी साहित्य संमेलनात सहभाग. व्यास क्रिएशन्स संस्थेचे मार्गदर्शक.
[…]

आत्माराम रावजी देशपांडे (कवी अनिल)

आत्माराम रावजी देशपांडे हे मराठी कवी होते. ते कवी अनिल या टोपण नावाने प्रसिद्ध होते. कवि अनिलांना मुक्तछंद ह्या काव्यप्रकाराचे प्रवर्तक समजले जाते. तसेच दशपदी – १० चरणांची कविता – हा काव्यप्रकार अनिलांनी सुरू केला. […]

जनरल अरुणकुमार वैद्य

२ महावीर चक्रे, एक परम विशिष्ट सेवापदक, एक अति विशिष्ट सेवा पदक अशी बहुमानाची पदके मिळविणारे एकमेव मराठी लष्करी अधिकारी. १ ऑगस्ट १९८३ ते ३१ जानेवारी १९८६ पर्यंत ते जनरल या हुद्यावर भारतीय लष्करप्रमुख म्हणजेच चीफ ऑफ आर्मी स्टाफ होते. […]

1 2 3 4