अशोक पाटोळे

पाटोळे यांनी लिहिलेली २० नाटके व्यावसायिक रंगभूमीवर गाजली. ‘झोपा आता गुपचूप’ हे त्यांचे पहिले नाटक. ‘मुंबई पोर्ट ट्र्स्ट’च्या ‘एकटा जीव सदाशिव’ या नाटकात त्यांनी विनोदी नायकाची भूमिका केली होती. चित्रकला, वक्तृत्व, गीतगायन व अभिनय यांचीही पाटोळ्यांना आवड होती. […]

अशोक नायगावकर

नायगावकरांनी बी.कॉम. पदवीपर्यंत शिक्षण केले. लग्न झाल्यावर नायगावकर हे करंबेळकर वाडी, गावठाण चेंबूर येथे राहत असत. शिक्षणानंतर त्यांनी बँकेत ३१ वर्षे नोकरी केली आणि मग स्वेच्छानिवृत्ती घेतली. […]

आनंद माडगूळकर

ग. दि. माडगूळकर यांचे निधन झाल्यानंतर सन १९८२ पासून अव्याहतपणे त्यांचे कार्य आनंद माडगूळकर पुढे चालवीत आहे. समग्र जीवन यासाठीच समर्पित असून आतापर्यंत गीतरामायणाचे एक हजार हून अधिक प्रयोग देशात आणि परदेशांत सादर केले आहेत. […]

अरुण टिकेकर

ते टाइम्स ऑफ इंडियाच्या १५० वर्षांचा इतिहास लिहिण्याच्या कामगिरीवर होते.आणिू कालांतराने ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये आले. पुढे ‘लोकसत्ता’चे संपादक झाले. […]

अरुण कशाळकर

अरुण कशाकरांचा ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर गायकीचा, तसेच जुन्या गायक मंडळींबाबतचा अतिशय डोळस अभ्यास आहे. कशाळकरांची गायकी ही तिन्ही घराण्यांच्या गायकाचा मिलाफ आहे. […]

अरविंद रघुनाथ मयेकर

त्रिदेव चित्रपटातील ओये ओये, तिरछी टोपीवाले या गाण्यातील इलेक्ट्रिक गिटार असो वा १९४२ अ लवस्टोरी चित्रपटातील एक लड़की को देखा तो ऐसा लगा मधील एकतारा, शालिमारचे रबाब या अफ़ग़ानी वाद्यामध्ये इंग्लिश बॅकग्राउंड असो वा ओ हंसीनि या गाण्यात संतूरच्या पद्धतीने वाजविलेले हार्प हे वाद्य असो, अरविंदजींनी केलेली कमाल अतुलनीयच आहे. […]

अरविंद पिळगावकर

सौभद्र’, ‘संशयकल्लोळ’, ‘मानापमान’, ‘शारदा’, ‘स्वयंवर’, ‘विद्याहरण’, ‘कान्होपात्रा’ या संगीत रंगभूमीवरील सर्व महत्त्वाच्या नाटकांत अरविंद पिळगांवकरांनी भूमिका केल्या. ‘सौभद्रा’त त्यांनी सर्व प्रमुख भूमिका केल्या. ‘मानापमाना’त ते धैर्यधरही झाले आणि लक्ष्मीधरही झाले. ‘कान्होपात्रा’त चोखोबा आणि राजा अशा दोन्ही भूमिका त्यांनी केल्या. […]

अरविंद देशपांडे

अरविंद देशपांडे यांच्या बरोबरचा सुलभा देशपांडे याचा संसार हा दोघंही नाटकात असल्याने कधी गंभीर, तर कधी गमतीदार असायचा. कारण अरविंद कधी दिलेली वचनं पाळत नसत. मग दर वाढदिवसाला एक चिठ्ठी सुलभाताईंना मिळे. ‘मी तुझं देणं लागतो. एक सिल्कची साडी.’ […]

अरविंद इनामदार

अरविंद इनामदार १ ऑक्टोबर १९९७ ते ५ जानेवारी २००० या दरम्यान राज्याचे पोलिस महासंचालक म्हणून कार्यरत होते. पोलिस खात्यातील सर्वोच्च पदावर काम करताना वेळप्रसंगी सरकारच्या निर्णयाला विरोध करत, एक वर्ष आधीच त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. […]

अमर शेख

स्वरचित आणि इतरांचीही कवने ते प्रभावीपणे पेश करीत. गोवामुक्ति-आंदोलनातही त्यांनी मोठे योगदान दिले. चिनी व पाकिस्तानी आक्रमणांच्या वेळी आपल्या शाहिरीने त्यांनी लाखो रूपयांचा निधी देशासाठी गोळा केला. […]

1 28 29 30 31 32 80