प्रा. राजेंद्र विठ्ठल (राजाभाऊ) शिरगुप्पे

नाटककार, कवी आणि साहित्यिक

राजाभाऊ या नावाने परिचित असेलेले प्रा. राजेंद्र विठ्ठल शिरगुप्पे यांची नाटककार, कवी, साहित्यिक म्हणूनही ओळख आहे. कोल्हापूर. सावंतवाडी, गडहिंग्लज येथे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले.

निपाणी येथील महिला बिडी कामगार व शेतकर्‍यांच्या तंबाखू आंदोलनापासून ते संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाले. शिरगुप्पे यांचे “सडक” हे नाटक व त्यातील कविता आजही आंदोलकांच्या तोंडी आहेत.

विद्रोही सांस्कृतिक चळवळीशी ते गेली दहा वर्षे जोडले गेले आहेत. धरणग्रस्त, देवदासी प्रथा निर्मूलनाच्या लढ्यातही ते सहभागी झाले होते. त्यांनी अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांत भाग घेतला आहे. नाट्यलेखन व दिग्दर्शन म्हणून त्यांची अनेक नाटके गाजली आहेत.

तुकोबांच्या पत्नीच्या जीवनावरील “तिच्या नवर्‍याचे वैकुंठगमन”, “कपान”, “होते कुरुप वेडे”, “उंटावरचा शहाणा”, “आम्ही क्रांतिसिंह आहोत”, “हा आणि बारावा” अशी नाटकांचे लेखनही त्यांनी केले.

किशोर, मासिक ऋग्वेद, लोकमत वगैरेंमध्येही त्यानी विपुल लेखन केले आहे. हिंदू-मुस्लिम समस्येवर आधारित “षड्यंत्र” या माहितीपटाची निर्मितीही त्यांनी केली होती. बसवाण्णांच्या तत्वज्ञानाचे ते गाढे अभ्यासक आहेत.

सांगली येथे झालेल्या दहाव्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद राजाभाऊ शिरगुप्पे यांनी भुषविले आहे.

## Shirguppe, Rajendra Vitthal (Rajabhau Shirguppe)
## Shirguppe, (Prof) Rajendra Vitthal

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*