शंकरराव रामराव खरात

ज्येष्ठ साहित्यिक, मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु

ज्येष्ठ साहित्यिक, कथा, कादंबरीकार, लेखक शंकरराव रामराव खरात यांचा जन्म ११ जुलै १९२१ रोजी आटपाडी  (जि. सांगली) येथे झाला.

“बारा बलुतेदार, तडीपार, सांगावा, गावशीव” आदी कथासंग्रह, “पारधी, हातभट्टी, झोपडपट्टी या कादंबर्‍या, तसेच “आज इथं उद्या तिथं” हे त्यांचे ललित लेखसंग्रह मराठीत मोलाचे मानले जातात.

याशिवाय “दलित वाङ्मय प्रेरणा व प्रवृत्ती, डॉ. आंबेडकरांचे धर्मांतर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात” आदी पुस्तके त्यांनी लिहिली.

त्यांचे तराळ – अंतराळ हे आत्मचरित्र प्रसिध्द आहे. याचे हिंदीतही भाषांतर झाले आहे.

ते मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु होते. त्यांना पुणे विद्यापीठाने डी. लिट पदवी देऊन गौरविले आहे.

1 Comment on शंकरराव रामराव खरात

Leave a Reply to कृष्णा इंगोले Cancel reply

Your email address will not be published.


*