प्रमिला दातार

प्रमिला दातार यांचा जन्म १४ जानेवारी १९४२ रोजी झाला.

तीस-पस्तीस वर्षांपूर्वी ‘सुनहरी यादें’ या वाद्यवृंदाच्या कार्यक्रमाला रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळत असे. आतापर्यंत या वाद्यवृंदाचे ४००० च्या वर कार्यक्रम झाले आहेत. यावरून त्याच्या लोकप्रियतेची कल्पना येईल. या वाद्यवृंदाच्या प्रवर्तक व संचालिका आहेत प्रमिला दातार.

प्रमिला दातार या माहेरच्या प्रमिला जोशी. प्रमिला यांना शाळेपासूनच गाण्याची स्टेजची आवड. शाळेत असतानाच नवरंग यांच्या कडे शास्त्रीय संगीताचे धडे त्यांनी घेतले व त्याचा उपयोग पुढे त्यांनी संगीत नाटकात काम केले तेव्हा झाला.

प्रमिला दातार यांनी त्यावेळी संगीत सौभद्र मध्ये नारद, संगीत शारदा मध्ये कोदंड, संगीत स्वयंवर मध्ये कृष्ण अशा वेगवेगळ्या भूमिका रंगवल्या.

बी ए झाल्यावर प्रत्येक स्त्रीच्या जीवनात एक महत्वाचा टप्पा येतो त्यानुसार श्री दातारांशी त्यांचा विवाह झाला तेव्हा त्यांचे वय होते फक्त सोळा. पुढे रितीप्रमाणे संसार सुरू झाला. १९६२ साली पहिले कन्या रत्न झाल्यावर श्री दातारांच्याच आग्रहावरून त्यांनी एम ए ला प्रवेश घेतला.

कुठलंही नवीन काम सुरू केल्यानंतर जशा अडचणी येतात तश्याच आल्या. गाठीशी तसा अनुभव कमी…त्यामुळे बरेच टक्के टोणपे खात खात त्यांनी आपला कार्यक्रम चालू ठेवला. त्या वेळी जणू काही प्रत्येक येणारा शो म्हणजे एक नवीन चॅलेज असे पण एक दोन वर्षातच हळू हळू जम बसत गेला.

प्रमिला दातार यांनी ज्येष्ठ गायक तलत महमूद यांच्याबरोबर परदेशात वेस्ट इंडिज, जमेका आणि शेवटी लंडन अनेक यशस्वी दौरे केले. हे सर्व चालू असतानाच रफी साब… किशोर कुमार जी…मन्ना डे यांच्या सारख्या महान गायकांबरोबर त्यांनी भरपूर परदेश दौरे केले. १९७५ ते १९८० च्या काळात त्यांना दोन महागुरू भेटले. एक म्हणजे प्रसिद्ध संगीतकार सी.रामचंद्र व त्या वेळचे आघाडीचे संगीतकार वसंतराव देसाई. सी.रामचंद्र यांच्या ‘गीतगोपाळ’ या कार्यक्रमात त्यानी अनेक गाणी गायली. तसेच वसंत देसाई यांच्या दिग्दर्शनाखाली त्यानी अनेक हिंदी व मराठी गाणी गायली. त्यांच्या आवाजातील गोडवा व ढंग इतक्या वर्षांनंतरही कायम आहे.

प्रमिला दातार यांना ‘बायांनो नवरे सांभाळा’ यातल्या गाण्याकरता सूर सिंगार संसद या संस्थेचे मियाँ तानसेन पुरस्कार मिळाला होता.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*