नंदेश उमप

लोकसंगीताच्या क्षेत्रात सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या गायक नंदेश उमप यांचा जन्म २० डिसेंबर १९७५ रोजी झाला.

दिवगंत लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी आपल्या घरात जी लोकसंगीताची गायकी रुजवली आणि जोपासली, तीच त्यांच्या पश्चात नंदेश सांभाळतो आहे. लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्याबरोबर वयाच्या आठव्या वर्षी नंदेश रंगमंचावर गायला उभा राहिला. तेव्हापासून जवळजवळ पंचवीस-तीस वर्षं नंदेश त्यांच्याबरोबर, त्यांच्या साथसंगतीने गात होता, घडत होता.

घराणंच लोकसंगीतकारांचं असल्यामुळे त्यासाठी लागणारा खुल्या आवाजाचा बाज नंदेशकडे जन्मतःच होता. पण शाहिरांच्या म्हणजे विठ्ठल उमपांच्या अस्सल गावरान गायकीचा वारसा त्याला मिळाला आणि त्याची गायकी उजळून निघाली. केवळ गायकीच नाही, तर लोककलावंतांसाठी आवश्यक असलेला लवचीक अभिनयाचा वारसाही त्याला मिळाला. त्यामुळेच लोकशाहिरांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या ‘जांभूळ आख्याना’चं काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला असताना, नंदेश खंबीरपणे पुढे आला. लोकशाहिरांचा ४३ मीटरचा पायघोळ अंगरखा अंगावर चढवत, थेट त्यांच्याच थाटात ‘द्रोपदीचं मन पाकुळलं’ म्हणत रंगभूमीवर उभा राहिला.

याशिवाय ‘आमी सुभाषबाबू बोलशे’ या बंगाली चित्रपटात सुभाषबाबूंवरचा बंगाली पोवाडाही गायला आहे. परंतु नाटक-सिनेमा-मालिकांत गाणी गाताना किंवा अभिनय करतानाही आपलं मूळपीठ लोककलाकाराचं आहे, ते नंदेश विसरलेला नाही. आपले लोकसंगीताचे कार्यक्रम त्याने सुरूच ठेवलेत.

नंदेश उमपला २०१२ साली बिस्मिल्लाखाँ युवा पुरस्कार देऊन संगीत नाटक अकादमीने गौरवलं होते.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*