मेघराजराजे भोसले

मेघराजराजे भोसले यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९७४ रोजी झाला.

मेघराज राजे भोसले यांचा जन्म बारामतीजवळच्या सणसरचा. भवानीनगर येथे त्यांचं प्राथमिक तसेच माध्यमिक शालेय शिक्षण झाले. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी पदवी घेतली. लहानपणापासूनच चित्रपट, नाट्य क्षेत्राची आवड असल्यामुळे ते कला क्षेत्राकडे वळले.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या मेघराज राजे भोसले यांनी १९९७ मध्ये ‘पांडव एंटरप्रायजेस’ या चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना करून ‘जाऊ तिथे खाऊ’, ‘मास्तर एके मास्तर’, ‘डंक्यावर डंका’, ‘संत वामनभाऊ’ या चार मराठी चित्रपटांची निर्मिती केली. गेल्या दोन दशकांपासून ते सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदाबरोबरच ते बालगंधर्व परिवार, पुणे, ऑल आर्टिस्ट वेल्फेअर असोसिएशन, पुणे, मराठी लोककला, लावणी निर्माता आणि कलाकार संघ, नाट्य निर्माता संघ, पुणे, कलासंस्कृती परिवार, पुणे, सांगाती फाऊंडेशन, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पुणे आदी संस्थांचेही ते अध्यक्ष आहेत.

देशभरातील प्रादेशिक व राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या चित्रपट संस्थांची शिखर संस्था म्हणून फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया ओळखली जाते.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*