किशोरी गोडबोले

मराठी सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी गोडबोले या मराठीतील नामवंत गायक जयवंत कुलकर्णी यांच्या कन्या होत. त्यांचा जन्म १५ डिसेंबर १९७५ रोजी झाला.

मिसेस तेंडुलकर, माधुरी मिडलक्लास, अधुरी एक कहाणी, हद कर दि, एक दो तीन, खिडकी, यासारख्या हिंदी मराठी मालिका त्यांनी आपल्या अभिनयाने गाजवल्या आहेत. फुल ३ धमाल, खबरदार, कोहराम, वन रूम किचन हे चित्रपट त्यांनी गाजवले आहेत.

किशोरी गोडबोले सध्या मराठी सृष्टीत कमी दिसत असल्या तरी हिंदी मालिकेत त्यांनी आपला चांगलाच जम बसवला आहे. किशोरी गोडबोले यांनी हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. ‘स्टार प्रवाह’वर ‘माधुरी मिडलक्लास’ मधल्या माया राजे या व्यक्तिरेखेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केलं होते. किशोरी गोडबोले आता मेरे साई या मालिकेत बायजा माँ च्या भूमिकेत दिसत आहेत.

त्यांनी हिंदी व मराठी इंडस्ट्रीतल्या अशोक सराफ, सचिन पिळगावकर, बिंदू दारा सिंग, अतुल परचुरे, भरत जाधव, देवेन भोजानी अशा एकापेक्षा एक विनोदवीरांसोबत त्यांनी काम केलं आहे. त्यांना हिंदी आणि मराठी यापैकी कुठल्या भाषेत काम करणं जास्त आवडतं, असा प्रश्न विचारला की मात्र उत्तर देताना त्यांची पंचाईतच होते.

किशोरी गोडबोले यांचे पती सचिन गोडबोले यांचे दादर येथे खास मराठी घरगुती खाद्य पदार्थाचे अर्थात फराळाचे अद्ययावत दुकान आहे. सचिन यांच्या आई सुमती गोडबोले यांनी अगदी पाच पदार्थ विकून हा व्यवसाय उभा केला होता.

“किशोरी गोडबोले” यांच्या भगिनी “संगीता शेंबेकर”. संगीता शेंबेकर या देखील आपल्या वडीलांप्रमाणे गायन क्षेत्रातच उतरल्या. त्यांचे पती किरण शेंबेकर आणि संगीता शेंबेकर दोघेही अनेक मंचावर आपल्या गायनाचे जाहीर कार्यक्रम सादर करतात. अनेक चित्रपट गीते देखील त्यांनी गायली आहेत. तर त्यांचा मुलगा निहार शेंबेकर हा देखील संगीत क्षेत्रात उत्तुंग भरारी घेताना दिसत आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*