भाग्यश्री पटवर्धन

१९८९ मध्ये भाग्यश्रीने ‘मैने प्या किया’ मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. मैने प्यार किया या चित्रपटामध्ये भाग्यश्री ने सलमान खानसोबत नायिकेची भूमिका केली होती. मैने प्यार किया प्रदर्शनावेळी भाग्यश्री केवळ १९ वर्षाची होती. मैने प्यार किया या चित्रपटामुळे ती रातोरात स्टार झाली. ह्यासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार मिळाला होता. […]

पद्मीनी कोल्हापुरे

पद्मिनी कोल्हापूरे… हिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमावणारी मराठमोळी अभिनेत्री. ‘प्रेम रोग’,’आहिस्ता आहिस्ता’,’वो सात दिन’,’विधाता’ अशा विविध सिनेमातील भूमिकांनी पद्मिनी कोल्हापूरे यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. त्यांच्या चेह-यावरील निरागसपणा, आकर्षक आणि घायाळ करणारं सौंदर्य यामुळे ८०च्या दशकात पद्मिनी कोल्हापूरे यांची वेगळीच जादू होती. […]

किशोरी गोडबोले

किशोरी गोडबोले आता मेरे साई या मालिकेत बायजा माँ च्या भूमिकेत दिसत आहेत. मेरे साई या मालिकेद्वारे किशोरी तीन वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतल्या आहेत. […]

चिटणीस, इंदिरा

तब्बल ११२ चित्रपटांमधून तसंच १५ नाट्यप्रयोगातून इंदिरा चिटणीस यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. विशेष म्हणजे त्यांनी साकारलेल्या कजाग, खाष्ट सासुच्या भुमिकांची दखल ही नोंद घेण्यासारखी आहे.भालजीं पेंढारकरांच्या “थोरातांची कमळा” या
चित्रपटातील भूमिकेसाठी इंदिरा चिटणीस यांना राज्य शासनाच्या “सर्वोत्कृष्ट चरित्र अभिनेत्री” तर गरिबाघरची लेक या चित्रपटासाठी “सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री”च्या पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
[…]

वत्सला देशमुख

वत्सला देशमुख या मराठी रंगभूमी तसंच चित्रपटातील अभिनेत्री असून हिंदी-मराठी चित्रपटांमधुन विविधांगी व चारित्र्य संपन्न अभिनेत्री तसंच सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या आहेत. […]

शिरोमणी, सुषमा

मराठी चित्रपटांमध्ये पारंपारिक स्त्री व्यक्तीरेखेला काहिसा छेद देऊन त्याजागी “डॅशिंग वुमन” आणि “तडफदार स्त्री” ची व्यक्तीरेखा साकारण्याचं काम सुषमा शिरोमणी यांनी चपलखपणे साध्य केलं; मराठी सिनेमामध्ये सर्वप्रथम “भिंगरी” या चित्रपटातून “आयटम सॉंग” चा ट्रेंड हा सुषमा शिरोमणींमुळे रुजला आणि तोही मराठमोळ्या ढंगात. चित्रपटांच्या निर्मिती व्यतिरिक्त सुषमा शिरोमणींनी “इम्पा” या चित्रपटांसाठीच्या संघटनेचं तीनवेळा अध्यक्षपद भुषवलं असून, पायरसी विरोधी कायदा हा त्यांच्या कार्यकाळातच अमलात आला.
[…]

डोंगरे, दया

मराठी चित्रपटातील खाष्ट सासू आणि करारी स्त्री, थोडी आधुनिक तर कधी हेखेखोर अशा भूमिकांची आठवण होताच डोळ्यासमोर नाव उभं रहातं अभिनेत्री “दया डोंगरे” यांचं. कोणतीही व्यक्तिरेखा समर्थपणे साकारणा-याची हातोटी दया डोंगरे यांना चांगलीच अवगत होती.
[…]

हुबळीकर, शांता

एकेकाळी सार्‍या भारतभर लोकप्रियता मिळवणा-या शांता हुबळीकरांची वैयक्तिक आयुष्यात लहानपणापासुनच चढउतार येत होते.आयुष्याचा उत्तरार्ध तर खुपच हालाखीचा होता.झगमगत्या जगापासून आणि स्वकियांपासून दूर अनेक वर्षे आश्रमात राहून अज्ञातवासातच काढली तेही एका अनाथाश्रमात.
[…]

रेखा कामत

गेली ६० वर्षे सिनेमा, नाटक, मालिका, जाहिरातींमधून अथकपणे अभिनयाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या रेखा कामत. वय वर्षे ८० चा टप्पा गाठूनही कार्यमग्न असलेल्या रेखा कामतांसाठी अभिनय म्हणजे लाखामोलाची गोष्ट म्हणता येईल.
[…]

मनोरमा वागळे

मराठी रंगभूमी आणि रुपेरी पडद्यावर तसेच एकूणच भारतीय कलेच्या प्रांगणात विनोदी नटांची आणि लेखकांची तशी कमतरता नाही. आजपर्यंत अनेक पुरुष विनोदी नटांनी आपल्याला पोट धरुन हसायला लावलंय. पण विनोदी स्त्री कलाकारांची उणीव ही आजही कुठेतरी जाणवतेय, अगदी सर्वच माध्यमांमध्ये.
[…]

1 2