जोशी, गायत्री अरविंद

Joshi, Gayatri Arvind

सौ. गायत्री अरविंद जोशी, पुर्वाश्रमीच्या जयश्री रानडे, यांचा जन्म एका संगीतप्रेमी कुटुंबामध्ये झाला. संगीताची आवड ही त्यांच्या मातुल घराण्याची उपजत देणगी आहे. त्यांचे मामा सुरमणी श्री. ए. के. अभ्यंकर यांच नाव सुपरिचित आहे.

सौ. गायत्री, मुंबई विद्यापिठाच्या वाणिज्य शाखेच्या पदवीधर आहेत. (with Music) त्यानंतर त्यांनी S.N.D.T. महाविद्यालयामधून प्रथम श्रेणीमध्ये M.A. ची पदवी प्राप्त केली आहे. तसेच अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची “संगीत विशारद” आणि त्यानंतर याच वर्षी म्हणजे सन २००४ मध्ये “संगीत अलंकार” ही पदवी प्राप्त केली आहे. ह्या दोन्ही पदव्या त्यांनी प्रथम श्रेणीमध्ये केल्या आहेत.
सौ. गायत्री, यांचे संगीताचे प्राथमिक शिक्षण वयाच्या आठव्या वर्षीपासून ठाण्याच्या श्रीमती लीलाताई शेलार यांच्याकडे सुरु झाले. त्यानंतर दोन वर्ष पंडीत श्री. ए.के. अभ्यंकर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण झाले. आणि आता गेली १०/१२ वर्ष, त्या ठाण्यातील किराणा घराण्याचे मान्यवर गायक पंडीत श्री. ए.के. अभ्यंकर यांच्याच पट्ट शिष्या सौ. विभावरी बांधवकर यांच्याकडे गुरु – शिष्य परंपरेनुसार किराणा गायकीची तालीम घेत आहेत.
सौ. गायत्री, यांनी अनेक शास्त्रीय व नाट्यसंगीत स्पर्धांमध्ये पुरस्कार मिळवले आहेत. उदा. पनवेल म्युझिक सर्कल, दादर – माटुंगा कल्चरल सेंटर, रोटरी क्लब ठाणे, स्वरसाधना समिती मुंबई, सुर – संवाद, ठाणे महापौर चषक इत्यादी. या सर्वांमध्ये मैलाचा दगड ठरली ती १९९७ मध्ये मुंबई आकाशवाणीच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरची शास्त्रीय संगीताची स्पर्धा. या स्पर्धेमध्ये त्यांनी राष्ट्रीय स्तरावर “दुसर्‍या क्रमांकाचा” पुरस्कार मिळवला. त्या मुंबई आकाशवाणीच्या मानद कलाकार आहेत. त्यांचे शास्त्रीय तसेच नाट्यसंगीताचे कार्यक्रम मुंबई आकाशवाणीवरुन होत असतात. तसेच मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि महाराष्ट्राचे अनेक ठिकाणी शास्त्रीय व नाट्यसंगीताचे कार्यक्रम होत असतात.
संपर्कः
जी / ७,  अंजली को-ऑप. सोसायटी लिमिटेड
एम डी मार्ग, पाचपाखाडी,
ठाणे (प). ४००६०२
दूरध्वनीः (०२२) २५३८४०९८ / ९९६७५४८४८३
(संदर्भ : स्वतः पाठविलेल्या माहितीवरुन)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*