चारुदत्त सरपोतदार

कॅटरर

पुण्याचे सार्वजनीक काका अशी ओळख असलेले चारुदत्त सरपोतदार उर्फ चारुकाका हे पुण्याच्या सांस्कृतिक जीवनातलं एक बहुआयामी आणि उत्साही व्यक्तिमत्त्व होते. गेली सुमारे सत्तरहून अधीक वर्षे ‘पूना गेस्ट हाउस’च्या माध्यमातून कलावंतांपासून सर्वसामान्य पुणेकर खवय्यांचे चोचले पुरविणारे चारुदत्त सरपोतदार हे शेवटपर्यत पुण्याच्या सार्वजनिक जीवनात कार्यरत होते.

गेल्या तीन पिढ्यांमधील नाट्य-चित्रपट कलावंत, निर्माते, दिग्दर्शक यांच्यासाठी ‘पुण्यातील घरचा हक्काचा माणूस’ असलेले चारूकाका अनेकांसाठी आयुष्याचा आधारस्तंभ बनले होते. विविध स्तरांतील हजारो माणसं ‘पूना गेस्ट हाउस’शी जोडली गेली. संस्थेसाठी जोडली गेलेली माणसं हेच सर्वांत मोठं भांडवल असतं.

सरपोतदार कुटुंब मूळचं रत्नागिरीजवळच्या नांदिवली – अंजणारी गावचं! या गावांमध्ये फक्त आणि फक्त सरपोतदारच राहतात. यातले चारुकाकांचे वडिल नानासाहेब सरपोतदार कलेवरील प्रेमापोटी १९३५ मध्ये पुण्यात आले. त्यांनी जुन्या पेशवे पार्कशेजारी मूकपटनिर्मितीसाठी ‘आर्यन फिल्म स्टुडिओ’ सुरू केला.

पुढे यशवंतराव चव्हाण, काकासाहेब गाडगीळ आणि ग. दि. माडगूळकर यांनी आग्रहानं बंडोपंतांना दिल्लीला नेलं आणि ‘पूना गेस्ट हाउस’ची ध्वजा दिल्लीमध्येही फडकली. ते दिल्लीतल्या मराठी माणसांसाठी सांस्कृतिक केंद्र बनलं. त्यांनी तिथं ‘दिल्ली दरबार’ हे मुखपत्र सुरू केलं. ‘पूना गेस्ट हाउस’ सुमारे साठ वर्षं, तर दिल्ली विधानसभेचं कँटीन बंडोपंतांनी २५ वर्षं चालवलं.

चारूकाकांच्या आत्मीयतेविषयीचा एक प्रसंग आवर्जून सांगण्यजोगा आहे. पानशेतचा प्रलय झाला त्या वेळी अभिनेत्री सुलोचनाबाई पुण्यात होत्या. त्यांना मुंबईला जायचं होतं; पण सगळे रस्ते बंद होते. आता काय करावं, ते न सुचून त्या ‘पूना गेस्ट हाउस’वर आल्या. त्यांचा मुंबईला परतायचा विचार ऐकून अस्वस्थ झालेले चारूकाका अक्षरश: त्यांच्या अंगावर ओरडले नि म्हणाले, ‘कुणीही कुठंही जायचं नाही इथून. निमूटपणे राहा इथं सगळं स्थिरस्थावर होईपर्यंत!’ सुलोचनाबाईंना चारूकाकांच्या मनातली काळजी, प्रेम, जिव्हाळा सारं काही त्या स्वरातून समजलं नि तेव्हापासून चारूकाका त्यांचे भाऊ होऊन गेले!

चारूकाकांची समाजाभिमुखता, कलाप्रेम, बांधिलकी, अगत्य या साऱ्याचाच वारसा  नवनव्या गोष्टी करण्याचा, आव्हानं स्वीकारण्याचा चारूकाकांचा वारसाही त्यांनी दोघांनी आत्मसात केलाय.

चारुकाका यांचे १९ जानेवारी २०१८ रोजी पुण्यात दुख:द निधन झाले.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*